शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीतील पाणीपुरवठा सुरू

By admin | Updated: May 4, 2017 01:30 IST

अहेरी शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो.

पाणीटंचाई टळली : पोकलँड मशीनने पाण्याचा प्रवाह वळविला अहेरी : अहेरी शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. प्राणहिता नदीची धार आटल्याने अहेरी शहराचा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद पडला होता. मात्र प्रशासनाने पोकलँड मशीन लावून पाण्याचा प्रवाह नदीच्या दिशेने वळविल्याने अहेरी शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात प्राणहिता नदीची पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. नदीमधील पाण्याच्या टाकीजवळील धार आटल्याने इनटेक वेलमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून अहेरी शहरातील पाणीपुरवठा बंद झाला होता. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची ओरड प्रचंड प्रमाणात वाढली होती. हातपंप व विहिरींवर पाणी भरणाऱ्या महिलांची गर्दी उसळली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत अगदी दुसऱ्याच दिवशी पोकलँड मशीनच्या सहाय्याने पाण्याचा प्रवाह टाकीच्या दिशेने वळविला. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी बंधारे बांधून पाण्याचा प्रवाह टाकीच्या दिशेने वळविला आहे. सदर कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे बल्लापूर येथील उपविभागीय अधिकारी सुशील पाटील, कार्यकारी अभियंता संजय वाघ यांच्या मार्गदर्शनात शाखा अभियंता अजय कोतपल्लीवार व तुशार सोनटक्के, अरूण कोंडलेकर यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)