शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजनेत विहिरी ऐवजी बोअरवेल द्या

By admin | Updated: October 8, 2015 01:02 IST

शासन दरवर्षी ठरविलेल्या उद्दिष्टानुसार सिंचनाची सुविधा देण्याच्या उद्देशाने १०० टक्के अनुदानात विहीर मंजूर करीत आहे.

गडचिरोली : शासन दरवर्षी ठरविलेल्या उद्दिष्टानुसार सिंचनाची सुविधा देण्याच्या उद्देशाने १०० टक्के अनुदानात विहीर मंजूर करीत आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागात शेतात ३० ते ३३ फूट विहिरीचे खोदकाम करूनही पाहिजे त्याप्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा उपयोगच शेतीच्या सिंचनासाठी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिंचन विहिरीच्या योजनेत बदल करून त्याऐवजी बोअरवेल शेतात करून देण्याची योजना गडचिरोली जिल्ह्यात राबवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्ह्याच्या बऱ्याच तालुक्यांमध्ये कुठेही सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे निसर्गावर शेती अवलंबून आहे. पर्यावरणाच्या बदलामुळे दिवसेंदिवस पाण्याचे प्रमाणही भूगर्भातून कमी होत आहे. काही वर्षी तर तलावात सुध्दा पाणी राहत नाही. त्यामुळे जनावरांच्या पाण्यासाठी मारामार होत असते. शेतकऱ्याच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होतो.ही परिस्थिती बदलविण्याकरिता शासन शेतकऱ्यांना दीड एकराच्या वरती आराजी पाहून कोरडवाहू शेतात १०० टक्के अनुदानावर शेतात विहिरीचे खोदाकाम करण्याकरिता ३ लाख रूपये मंजूर करून विहिरीचे बांधकाम करण्याची योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सिमेंट, गिट्टी, लोखंड, रेती याचा वापर करून शेतकरी शेतात ३० ते ३५ फूट विहिरीचे खोदकाम पूर्ण करतो. परंतु ३० ते ३५ फूट विहीर खोदकाम करूनही त्यावर इंजीन, इलेक्ट्रीक, पंप, बसवून सुरू केले. पाणी घेतले तर ३० मिनिटेही वीज पंप चालत नाही व शेती सिंचनासाठी पाणीही पुरत नाही. त्यामुळे सरकारने सिंचन विहिरीची योजना सुरू करूनही शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होतांना दिसत नाही, असे चित्र गडचिरोली जिल्ह्यात आहे.