शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्ली वनपरिक्षेत्राच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST

आलापल्ली : एटापल्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. एच. राठोड यांच्या कार्यकाळात झालेल्या कामकाजाची व आर्थिक व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत सखोल ...

आलापल्ली : एटापल्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. एच. राठोड यांच्या कार्यकाळात झालेल्या कामकाजाची व आर्थिक व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी मुख्यमंत्री तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भामरागड वन विभागातील एटापल्ली वनपरिक्षेत्रात एस. एच. राठोड वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून रुजू झाले. त्या तारखेपासून आजपर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेली एकूण मंजूर कामे व त्या कामावरील करण्यात आलेला खर्च नियमानुसार करण्यात आला आहे काय. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण बिटाचे बीट निरीक्षण करून त्या बिटातील वनजमिनीवरील अवैध अतिक्रमण, अवैध उत्खनन, अवैध वृक्षतोड, वनरक्षक, वनपाल व अन्य वन कर्मचाऱ्यांची मुख्यालयी उपस्थिती, त्यांच्या कार्यकाळात कामावर लावण्यात आलेले एकूण मजूर, त्या मजुरांचे प्रत्येक व्हाऊचर तपासून घ्यावे. त्यांच्या सह्या वा अंगठे तपासावेत. मजुरांनी प्रत्यक्ष किती दिवस कामे केली व त्यांना कामावर किती दिवस दाखविले, मोजमाप पुस्तिका, प्रत्येक मजुराची बँक पुस्तिका तपासावी. नियमानुसार करण्यात आलेली कामे याची खात्री करणे व त्यांच्या कालावधीत करण्यात आलेली खोदतळे, एकूण साहित्य खरेदी, रोपवन लागवड व त्यावरील निंदणीचे सगळे व्हाऊचर यासह अन्य मुद्द्‌यांवर एटापल्ली वनपरिक्षेत्रातील आरएफओ एस. एच. राठोड यांच्या कार्यकाळातील त्यांच्या कार्यक्षेत्रात झालेेल्या कामकाजाची व आर्थिक व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केली आहे. महिनाभरात चौकशीला सुरुवात न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.