शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाह करणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:53 IST

राज्यातील जातीयता, भेदाभेद कमी करून जातीय सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना अंमलात आणली. मात्र सदर योजनेच्या अनुदानासाठी शासनाकडून निधी मिळण्यास विलंब होत असून अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनही दिरंगाई होत असल्याने आंतरजातीय विवाह करणारी जिल्ह्यातील अनेक जोडपी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देअनेक जोडपी अनुदानाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील जातीयता, भेदाभेद कमी करून जातीय सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना अंमलात आणली. मात्र सदर योजनेच्या अनुदानासाठी शासनाकडून निधी मिळण्यास विलंब होत असून अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनही दिरंगाई होत असल्याने आंतरजातीय विवाह करणारी जिल्ह्यातील अनेक जोडपी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्ती जाती, भटक्या जमाती व विशेष मागस प्रवर्ग यापैकी एक व्यक्ती सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौध्द, शिख समाजातील व्यक्तींशी विवाह केल्यास या योजनेंतर्गत जोडप्यांना ५० हजार रुपयाचे अनुदान दिले जाते.याशिवाय मागासवर्ग प्रवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य दिले जाते. विशेष म्हणजे, ५० हजार रुपयांचा धनादेश आंतरजातीय विवाह करणाºया पती, पत्नी या दोघांच्या संयुक्त नावाने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे प्रदान केला जातो.सदर योजनेंतर्गत आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना अनुदान देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्के वाटा असतो. ५० टक्क्याच्या हिस्यानुसार केंद्र व राज्य सरकार जिल्हा परिषदेला मागणीनुसार निधी उपलबध करून देत असते.जिल्हा परिषदेच्या वतीने अशा जोडप्यांना अनुदान वाटप करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. मात्र निधी मिळण्यासाठी शासनस्तरावरून विलंब होत आहे. परिणामी आंतरजातीय विवाह करणारी अनेक जोडपी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. परिणामी काही जोडपी जि.प. समाज कल्याण विभागात जाऊन शासनाकडून निधी आला काय, अशी विचारणा करीत असल्याचे दिसून येत आहे.अनुदानासाठी प्रस्तावासोबत लग्न करणाºया जोडप्यांची टीसी, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, लग्न केल्याचा फोटो, दोन प्रतिष्ठीत नागरिकांचे शिफारस पत्र (सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, नगरसेवक) आदी दस्तावेज जोडणे आवश्यक आहे.पडताळणीनंतर होते अनुदान वाटपजि.प. समाज कल्याण कार्यालयात जोडप्यांचे प्रस्ताव व दस्तावेजाची छाणनी केली जाते. समाज कल्याण अधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर हे प्रस्ताव जि.प.च्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पडताळणीसाठी पाठविले जातात. त्यांच्याकडून तपासणी व पडताळणी झाल्यानंतर प्रस्ताव मंजूर केले जातात. त्यानंतर जोडप्यांना अनुदानाचे वाटप केले जात आहे.