शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

धान्य सडल्याची चौकशी करा

By admin | Updated: May 30, 2014 00:05 IST

शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली सन २0११-१२ पासून खरेदी केलेल्या धान्याची वाहतूक व भरपाई न केल्याने ३ ते ४ पावसाळ्यापासून करोडो रूपयाचे धान्य भिजल्याने सडण्याच्या मार्गावर आहे.

कारवाई करा : राष्ट्रीय जनहितवादी व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीची मागणीएटापल्ली : शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली सन २0११-१२ पासून खरेदी केलेल्या धान्याची वाहतूक व भरपाई न केल्याने ३ ते ४ पावसाळ्यापासून करोडो रूपयाचे धान्य भिजल्याने सडण्याच्या मार्गावर आहे.  करोडो रूपयांच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून  दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जनहितवादी व अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती एटापल्लीच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर गोडाऊन एटापल्ली शहरातील वस्तीच्या मध्यभागी असल्यामुळे सडलेले धान्य खाल्ल्याने अनेक पाळीव जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. तसेच धान्य सडल्याने दूषित विषारी वायुची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. त्यामुळे मनुष्य व प्राण्यांचा आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.  तसेच परिसरातील विहिरी व बोरवेलमधून सडलेल्या धानाचे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. परिसरातील नागरिकांना घरात राहणे अत्यंत धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यापूर्वी धानाची विल्हेवाट न लावल्यास आरोग्यास गंभीर धोका होऊ शकतो. जीवित हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सडलेले धान्य ठिकाणावरून त्वरित उचलावे. सडलेल्या धान्यांची त्वरित उचल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.  भविष्य काळात उद्भवणार्‍या परिस्थितीला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. असा इशाराही जनहितवादी समिती व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने तहसीलदार वैद्य यांना निवेदनातून देण्यात आला. निवेदन देतांना गणेश दुर्गे,  राकेश पुंगाटी, सरिता पुंगाटी,  सुरेश बारसागडे आदी उपस्थित होते. या प्रश्नावर सातत्याने मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)