शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

अहेरीत ट्रॅक्टरधारकांचे बेमुदत उपोषण सुरू

By admin | Updated: August 6, 2015 02:16 IST

अमानवीय गौण खनिज कायद्यामध्ये शिथिलता आणावी, जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना विविध खनिज वाहतूक व उत्खननाचे परवाने देऊन उपासमारी थांबवावी,

पाचही तालुक्यातील ट्रॅक्टरधारक सहभागी : रेती उत्खनन व वाहतुकीच्या जाचक अटी रद्द कराअहेरी : अमानवीय गौण खनिज कायद्यामध्ये शिथिलता आणावी, जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना विविध खनिज वाहतूक व उत्खननाचे परवाने देऊन उपासमारी थांबवावी, या मागणीला घेऊन अहेरी तालुका ट्रॅक्टर मालक, चालक संघटनेच्या वतीने बुधवारपासून अहेरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात अहेरी उपविभागातील अहेरी, मुलचेरा, भामरागड, सिरोंचा व एटापल्ली आदी पाच तालुक्यांतील ट्रॅक्टर मालक, चालक व ट्रॅक्टर मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. बेमूदत उपोषणापूर्वी दहा ते बारा दिवसांपासून अहेरी व एटापल्ली येथील ट्रॅक्टरचालक गावात मोकळ्या जागेत सर्व ट्रॅक्टर व ट्रॉली उभ्या करून कामबंद आंदोलन पुकारले होते. यासंदर्भात प्रशासन व शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर ट्रॅक्टर मालक, चालक संघटनेने अहेरीच्या उपविभागीय कार्यालयासमोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान ट्रॅक्टर मालक, चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, ट्रॅक्टर विकत घेऊन गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या अहेरी उपविभागात ५०० हून अधिक आहे. ट्रॅक्टर वाहतुकीच्या भरवशावर ट्रॅक्टर मालकाच्या ५०० कुटुंबासह ट्रॅक्टरवरील जवळपास पाच हजार मजूर कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. तसेच कंत्राटदार, मिस्त्री, मजूर आदींना रोजगार प्राप्त होतो. मात्र शासनाने नव्याने लादलेल्या जाचक अटीमुळे बांधकामांशी संबंधित सर्व घटकांवर उपासमारीची पाळी आली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. या उपोषणात ट्रॅक्टर मालक, चालक संघटना अहेरीचे अध्यक्ष रवी नेलकुद्री, उमेश गुप्ता, कपील गुंडावार, गणेश चल्लावार, आबिद शेख, इरफान शेख, राकेश वर्दलवार, प्रभाकर डोंगरे, संजय झोडे, संजय अलोणे आदी सहभागी झाले आहेत.