शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न ठप्प, वाहनाच्या कर्जाचे हप्ते भरायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:36 IST

काहीतरी राेजगार असावा या उद्देशाने काही बेराेजगार युवकांनी सुमाे, स्काॅर्पिओ, झायलाे, बाेलेराे, तसेच कार वर्गातील वाहने खरेदी करून व्यवसाय ...

काहीतरी राेजगार असावा या उद्देशाने काही बेराेजगार युवकांनी सुमाे, स्काॅर्पिओ, झायलाे, बाेलेराे, तसेच कार वर्गातील वाहने खरेदी करून व्यवसाय सुरू केला. बहुतांशजण चालक व मालक स्वत:च आहेत. ही सर्वच वाहने दहा लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची आहेत. अनेक वाहनांसाठी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढण्यात आले आहे. काेराेनामुळे मागील वर्षीही लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. पुन्हा दुसऱ्या लाटेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे लांब प्रवासासाठी वाहन भाड्याने घेणे बंद झाले आहे. तसेच लग्न व इतर समारंभांमध्ये नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. परिणामी ग्राहक मिळणे कठीण झाले आहे. मागील वर्षभरापासून उत्पन्न ठप्प पडले असल्याने कर्जाचे हप्ते कसे भरावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बाॅक्स

वाहने सुरू, पण गॅरेज बंद

वाहन क्षमतेच्या निम्मे प्रवासी बसवून प्रवास करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. मात्र, गॅरेज व ऑटाेमाेबाईलची दुकाने बंद आहेत. एखादेवेळी वाहनात बिघाड निर्माण झाल्यास दुरुस्ती करण्यास अडचण निर्माण हाेत आहेत. सामानही मिळत नसल्याने थाेडाफार जरी वाहनात बिघाड निर्माण झाल्यास ते घरीच ठेवावे लागत आहे. गॅरेज बंद असल्याने त्यांचाही राेजगार हिरावला गेला आहे.

बाॅक्स

वाहनचालकांसमाेर अडचणींचा डाेंगर

वाहन बंद राहिले तरी वाहनाची देखभाल व दुरुस्ती करावीच लागते. त्यामुळे वाहनाचा किमान खर्च सुरूच राहतो. हा खर्च न केल्यास वाहन बंद पडण्याची शक्यता राहते. कर्ज काढून वाहन खरेदी केले आहे. कर्जाचे हप्ते लाखाेच्या घरात आहेत. हे हप्ते कसे भरावे असा प्रश्न वाहनमालकांसमाेर निर्माण झाला आहे. वाहनचालकांचा राेजगारही हिरावला गेला आहे.

प्रतिक्रिया -

- वाहने पाॅईंटवर, मात्र ग्राहक मिळेना-

दिवसातून एखादा ग्राहक मिळेल या आशेने वाहने शहरातील कार पाॅईंटवर लावली जात आहेत. मात्र, ग्राहकच मिळत नसल्याने आम्ही हतबल झालाे आहाेत. दुसऱ्या जिल्ह्यात साेडण्यासाठी ई-पास काढलेली एखादी व्यक्ती मिळते. लाॅकडाऊनमुळे वाहनांचा व्यवसाय जवळपास ठप्पच पडला आहे.

संदीप कांबळे, वाहन चालकमालक

कर्ज काढून वाहन खरेदी केले. वर्षभरापासून या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या कर्जाचे हप्ते कसे भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीतील स्थिती लक्षात घेता कर्जावरील व्याज माफ करावे. तसेच कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत वाढवून देण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया-

गॅरेजवाल्यांचे पाेट-पाणी बंद

मागील महिनाभरापासून गॅरेज बंद आहेत. दरराेज येणाऱ्या उत्पन्नातून संसाराचा प्रपंच सुरू हाेता. मात्र, दुकानच बंद असल्याने राेजीराेटी थांबली आहे. मागील महिनाभरापासून आम्ही कसे जीवन जगत आहाेत, हे आम्हालाच माहीत.

सूरज रामटेके, गॅरेज मालक

वाहन हे अत्यावश्यक वस्तू झाली आहे. मंत्री, जिल्हाधिकारी व इतर सर्वसामान्य सर्वच नागरिक संचारबंदीतही वाहनाचा वापर करीत आहेत. वाहन बिघडल्यास त्यांचे कामकाजच ठप्प पडू शकते. गॅरेजचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून ते सुरू करू देण्याची परवानगी आवश्यक हाेती.

सुरेश मडावी, गॅरेज मजूर

शहरात वाहने किती

कार- ३०००

जीप-२००

दुचाकी-३५०००

रिक्षा-३००

ट्रक -२००

रुग्णवाहिका-४०