शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीत अपुरा पाणीपुरवठा

By admin | Updated: June 27, 2017 00:52 IST

वाढत्या लोकसंख्येच्या मानाने आरमोरी शहरवासीयांना नळाद्वारे पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याने अनेक वॉर्डातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

टंचाई : १९ लाख लिटरची गरज मात्र मिळते सात लाख लिटर पाणीविलास चिलबुले । लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : वाढत्या लोकसंख्येच्या मानाने आरमोरी शहरवासीयांना नळाद्वारे पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याने अनेक वॉर्डातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. लोकसंख्येनुसार आरमोरी शहरवासीयानां १९ लाख लीटर पाण्याची गरज आहे. मात्र येथील नळ पाणीपुरवठा योजना तोकडी असल्याने केवळ सात लाख लीटर पाणीपुरवठा नळाद्वारे होत आहे.आरमोरी नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने गाढवी व वैनगंगा अशा दोन नद्यांवर नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या दोन्ही योजनेद्वारे शहरवासीयांना दररोज ६ लाख ८० हजार लीटर पाणीपुरवठा केला जातो. २०११ च्या जनगणनेनुसार आरमोरी शहराची लोकसंख्या २२ हजार ३४६ आहे. २०१७ वर्षातील सध्याची आरमोरी शहराची लोकसंख्या २७ हजारांच्या आसपास आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येनुसार नगर पंचायतीद्वारे नागरिकांना नळाद्वारे पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. शासनाच्या नियमानुसार शहरी भागात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिवसभर ७० लीटर पाण्याची गरज असते, आरमोरी शहराची सध्याची लोकसंख्या २७ हजार आहे. ऐवढ्या लोकसंख्येला दररोज १९ लाख लीटर पाण्याची गरज आहे. मात्र नळाद्वारे केवळ ६ लाख ८० हजार लीटर इतकाच पाणीपुरवठा होत आहे. नळ योजनेअंतर्गत नदीपात्रातून इंटेक व्हेलमध्ये पाणी ओढण्यासाठी कमी विद्युत दाबाची मशीन बसविण्यात आली आहे. त्यामुळे आरमोरी शहरात पाणीपुरवठा होण्यासाठी बराच विलंब होतो. आरमोरी शहरात एक पाणी टाकी एक लाख लीटर तर दुसरी टाकी २ लाख ३० हजार लीटर क्षमतेची आहे. गाढवी नदीवरून येणाऱ्या पाणीटाकीची क्षमता ३.५० लाख लीटर आहे. अशा प्रकारे एकूण ६ लाख ८० हजार लीटरचा पाणीपुरवठा शहरात केला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून आरमोरी शहरातील बहुतांश वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. बाजारपेठ, काळागोटा परिसरात नळाला पाणी येत नसल्याने येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासंदर्भात या वॉर्डातील नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रारीही दिल्या आहेत. आरमोरी शहरात अनेक मोठे दिग्गज नेते वास्तव्य करतात. मात्र शहरातील पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनस्तरावर कुठलाही पाठपुरावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे चढ भागातील नागरिकांना दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शहराच्या काही भागात नळाला एक दिवसाआड पाणी येते. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व नगर पंचायत प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन आरमोरी शहरासाठी नवी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, जेणेकरून आरमोरी शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न कामस्वरूपी मार्गी लागेल, अशी मागणी आहे. मुख्याधिकाऱ्यांचा पुढाकारशहरातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन आरमोरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी पाणीटंचाई असलेल्या संबंधित वॉर्डात विहीर व हातपंपावर सबमर्शिबल पाण्याची मशीन लावून नळांमार्फत पाणीपुरवठा सुरू केला. यामुळे नियमित नळाचे पाणी न मिळणाऱ्या घरी पाणीपुरवठा होऊ लागला. त्यामुळे काही नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. अर्ध्या शहराला मिळते अशुद्ध पाणीआरमोरी शहरात नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाते. यासाठी बर्डी परिसरात दोन तर शहराच्या मध्यभागी एक टाकी आहे. वैनगंगा नदीवरून येणारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. हे फिल्टरयुक्त पाणी अर्ध्या शहराला बर्डी परिसर व शहराच्या काही भागातील कुटुंबांना मिळते. मात्र गाढवी नदीवरही दुसरी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. येथे जलशुद्धीकरण केंद्राची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे अर्ध्या शहराच्या भागात अशुद्ध पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या अनेक भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने काही नागरिक टिल्लूपंप लावून नळाचे अधिकाधिक पाणी खेचून घेतात. यामुळे काही कुटुंबांना पाणी मिळत नाही.वाढत्या लोकसंख्येच्या मानाने आरमोरी शहराला नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा कमी आहे. आणखी पाणीपुरवठ्याची गरज असून वाढीव नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगर पंचायतीमार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. सदर वाढीव नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यास पाणी समस्या मार्गी लागेल.- सतीश चौधरी, मुख्याधिकारी,नगर पंचायत, आरमोरी