शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
8
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
9
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
10
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
11
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
12
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
13
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
14
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
15
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
16
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
17
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
18
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
19
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
20
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..

कायद्याची प्रभावी अमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:31 IST

गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र प्रतिबंध कायदा २००३ ची संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यंत्रणांना दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना निर्देश : गर्भधारणा व प्रसूतीपूर्व निदान तंत्र प्रतिबंध कायद्यावर कार्यशाळा

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र प्रतिबंध कायदा २००३ ची संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यंत्रणांना दिले.जिल्ह्यात मुलींचा जन्मदर घडण्यामागील कारणांवर गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र प्रतिबंधक कायदा १९९४ सुधारीत २००३ अंतर्गत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी ते बोलत होते.या कार्यशाळेत विधी सेवा प्राधिकरणाचे धनराज काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशीकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, डॉ. अरुण शेंद्रे, डॉ. अरुण रोठोड, विधी समुपदेशक डॉ. तृप्ती राऊत उपस्थित होते.कार्यशाळेला जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, सोनोग्राफी सेंटर चालकसुध्दा उपस्थित होते. यावेळी धनराज काळे यांनी पीसीपीएनडीटी या अंतर्गत येणारे कायदे, नियम या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. खंडाते म्हणाले, जिल्ह्यातील सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रात अवैध गर्भपात होत असल्यास याची शंका आल्यास नागरिकांनी एक सामाजिक दायीत्व म्हणून आॅनलाईन तक्रार करावी, असे आवाहन केले.आॅनलाईन तक्रार करण्यासाठी  संकेतस्थळावर किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४४७५ या दूरध्वनी क्रमांकावर कळविण्याचे आवाहन सुध्दा डॉ. खंडाते यांनी केली. आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील आठवडी बाजार, जत्रा या गर्दीच्या ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमाचे, तसेच होर्डींगव्दारे जनतेपर्यंत माहिती पोहचविण्याचे नियोजन केले आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिंह यांनी मागील महिन्यात जिल्ह्यात करण्यात आलेल्या सोनोग्राफी व गर्भपात तपासणीचा आढावा घेतला.