शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

वैध घाटातून अवैधपणे रेतीची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 05:00 IST

कुरखेडापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभीटोला येथील रेती घाटातून मागील आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून ती रेती साठवणूक करून विकली जात आहे. कुंभीटोला येथील स्मशानभूमीतून रेती वाहतुकीसाठी जेसीबीने मार्ग तयार करून संबंधित कंत्राटदाराने कुंभीटोलावासीयांची मने दुखावली आहेत. अनेक नागरिकांच्या पूर्वजांचे मृतदेह त्या स्मशानभूमीत पुरले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : सती नदीच्या कुरखेडा या रेतीघाटातून संबंधित कंत्राटदाराने रेती काढणे सुरू केले आहे. मात्र, सर्व शासकीय सूचना आणि नियम धाब्यावर बसवत टिप्परने दिवसरात्र नियमबाह्यपणे रेती वाहतूक केली जात असल्याने पर्यावरणाची ऐसीतैसी होण्यासोबत कुंभीटोलावासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कुरखेडापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभीटोला येथील रेती घाटातून मागील आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून ती रेती साठवणूक करून विकली जात आहे. कुंभीटोला येथील स्मशानभूमीतून रेती वाहतुकीसाठी जेसीबीने मार्ग तयार करून संबंधित कंत्राटदाराने कुंभीटोलावासीयांची मने दुखावली आहेत. अनेक नागरिकांच्या पूर्वजांचे मृतदेह त्या स्मशानभूमीत पुरले आहेत. त्याच्यावरून जेसीबी व टिप्पर चालवून गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुंभीटोला येथील नागरिकांनी केली आहे. दोन दिवसांत या रेती प्रकरणाची सखोल चौकशी झाली नाही तर कुंभीटोलावासीयांनी आंदोलन करण्याचा  इशारा प्रशासनाला दिला आहे. कुंभीटोला गावातून जड वाहतूक बंद झाली पाहिजे, शंकरपट व खेळाच्या मैदानावर जड वाहतूक करू नये, कुंभीटोला डांबरीकरण रस्त्याची दुरवस्था झाली तर संबंधित ठेकेदाराकडून नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अधिकाऱ्यांनी घेतले झोपेचे सोंग-    या अगोदर महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी रात्री-बेरात्री व दिवसाढवळ्या ट्रॅक्टरमध्ये रेती नसताना ट्रॅक्टर जप्त करून कारवाई केल्याचे बोलले जात आहे. सोबतच ज्या ठिकाणी रेती टाकली त्या रेतीचा पंचनामा करून कारवाई केल्याचे निदर्शनास आले आहे, पण कुरखेडा घाटातील रेती ठेकेदारावर मात्र कुठलीच कारवाई न करता विशेष मेहरबानी दाखविली जात असल्याने प्रशासकीय यंत्रणेचे त्याला पाठबळ तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पर्यावरणाच्या नियमांची ऐसीतैसी -    पर्यावरण विभागाच्या नियमानुसार परवानगी दिलेल्या खोलीपेक्षा अधिक खोलवर जाऊन रेती काढता येत नाही. तसे निदर्शनास आल्यास लिलावधारकांकडून घेण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करून तो रेती उपसा अवैध ठरविला जातो. त्याचा परवाना सुद्धा रद्द केला जातो. -    लिलावधारकाला नियमानुसार यंत्रसामग्री नदीपात्रात उतरवता येत नाही. वाहनात वाळू भरण्यासाठी पोकलेन किंवा जेसीबीसारख्या यांत्र वापरावर बंदी आहे. मात्र, हे सारे नियम धाब्यावर बसवून रेती काढली जात आहे.

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी