शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मुद्देमालासह तब्बल 17 लाखांची पकडली अवैध दारू

By admin | Updated: May 2, 2017 18:32 IST

अवैध दारू पकडल्याने दिवसाढवळ्या अवैद्य दारूची करणा-या आरोपींच्या मुसक्या आवळल्याने अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

ऑनलाइन लोकमतगडचिरोली, दि. 2 -  सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथून देसाईगंज मार्गे अवैध दारू देसाईगंज वनविभागाच्या नाक्याजवळ एकलपूर गौरनगर जोडमार्गापासून सिनेस्टाईल पाठलाग करून मोठ्या शिताफीने दोन चारचाकी वाहनासह तब्बल सतरा लाखांचा मुद्दे मालासह अवैध दारू पकडल्याने दिवसाढवळ्या अवैद्य दारूची करणा-या आरोपींच्या मुसक्या आवळल्याने अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.देसाईगंज पोलिसांनी पकडलेल्या मुद्देमालासह दारू वाहतूक करणारी बोलेरो पीक अप क्रमांक एमपी एच ३३ जी २२५८ मध्ये दोन आरोपी तर दुसरी गाडी टवेरा क्रमांक एमएच ३४ एए ०२३५ गाडी असून, यात दोन आरोपी होते. देसाईगंज पोलिसांनी चारही आरोपी ताब्यात घेतले असून, अटक करण्यात आलेले चारही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. विनोद आनंदराव राऊत २४ वर्ष मालडोंगरी ता. ब्रम्हपूरी, जि. चंद्रपूर हा पीक अप चालक, संघपाल रामचंद्र पिलारे २६ वर्ष रा. मळेघाट, ता. लाखांदूर जि. भंडारा, हा टवेरा चालक असून, मकसूद नशिर बेग ३५ वर्ष रा. ब्रम्हपुरी गुजरीवार्ड, ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर, रंगदेव दिनबाजी वंजारी ५० वर्ष रा. साकोली जि. भंडारा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. रंगदेव वंजारी हा आरोग्य विभागाचा शासकीय कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आज २ मे रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान गौरनगर एकलपूर जोडमार्गाजवळ पोलीस ताफ्यासह पाळत ठेवली होती, याच दरम्यान अर्जुनी मार्गावरून एक टवेरा व दुसरी बोलेरो येत असल्याची दिसले. हात देऊनही दोन्ही गाड्या न थांबल्याने संशय आणखीनच बळावला असून, या दोन्ही गाड्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून वडसा वनविभागाच्या नाक्याजवळ दोन्ही गाड्यांना अडविण्यात यशस्वी झाले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक मिर्झा, रामभाऊ मेश्राम, अरुण जुवारे, जितू भोयर, सिताराम लांजेवार, श्रीराम खरकाटे, रेकचंद पत्रे आदी होते. सहा लाखांची दारू आणि सहा लाखाची पिकअप व पाच लाख रुपयाची टवेरा कार असे एकूण 17 लाख रुपयांची मुद्देमालासह अवैध दारू जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  अधिक तपास देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.