शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू व्यवसायाला वचक बसणार

By admin | Updated: April 24, 2017 01:11 IST

राज्यात पहिल्यांदाच दारूची वाहतूक करणारे वाहन सरकार जमा करण्याची कारवाई गडचिरोली पोलिसांनी केली.

पोलिसांचा दावा : वाहतुकीचे वाहन सरकारजमा करण्याची कारवाईगडचिरोली : राज्यात पहिल्यांदाच दारूची वाहतूक करणारे वाहन सरकार जमा करण्याची कारवाई गडचिरोली पोलिसांनी केली. सदर कारवाईमुळे दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीसाठी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल व अवैध दारूच्या व्यवसायाला प्रतिबंध बसेल, असा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात १९९२ मध्ये लोक आंदोलन उभे झाल्याने दारूबंदी करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यात सर्वत्र अवैध दारू विक्रीचा व्यवसायही वाढीला लागला होता. १ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी झाल्यानंतर जिल्ह्यात अवैध दारू व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई करण्याला सुरूवात झाली. तसेच मुंबई दारूबंदी कायद्यातही बदल करण्यात आले. त्यामुळे अवैध दारूच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांनी या धंद्याला रामराम ठोकला. त्यानंतरही लहान व मोठ्या गावांमध्ये अवैध दारूचा व्यवसाय सुरूच आहे. दारूची वाहतूक करण्यासाठी आलिशान गाड्यांचा वापर अलिकडे वाढलेला होता. जिल्ह्यातून व इतर राज्यातून जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक केली जात आहे. अवैध दारूचा व्यवसाय करणारे लोक संबंधित वाहन सोडून तीच वाहने पुन्हा पुन्हा दारूच्या वाहतुकीसाठी वापरत होते. मात्र पोलीस प्रशासनाने ११ डिसेंबर २०१६ रोजी चंद्रकुमार मनोहर गुंडावार यांचे मालकीचे वाहन सरकारजमा करण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे आता भविष्यात अवैध दारूच्या व्यवसायात गुंतलेल्या पांढरपेशी गुन्हेगार, पपेट गुन्हेगार यांना मोठा आर्थिक फटका बसेल. परिणामी अवैध दारूच्या धंद्याला प्रभाविपणे प्रतिबंध होईल, असा विश्वास पोलीस विभागाने व्यक्त केला आहे. वाहन सरकार जमा करण्याच्या निर्णयाचे समाजाच्या विविध स्तरातून स्वागत होत आहे. मात्र ही कारवाई निरंतर सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दारूची तस्करी, दारू जप्त, साहित्य जप्त, दारू तस्करी करणाऱ्यावर गुन्हा आदी बाबी नित्याच्या झाल्या होत्या. मात्र दारूची तस्करी करणारे वाहन सरकार जमा करण्याची घटना वाचून आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. यापुढे वन विभागाप्रमाणे लाकडांसोबत जसे वाहने देखील जप्त केली जातात त्याचप्रमाणे दारू सोबत वाहने ही जप्त करण्यात आली तर नक्कीच दारू तस्करीवर फार मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल यात शंका नाही. ही कार्यवाही सर्वच दारू तस्करी करणाऱ्या वाहनांवर होत राहावी, व पुढेही सुरूच राहावी. अन्यथा पोलीस खात्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन नेहमीचाच होऊन बसेल. पोलीस विभागाच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.- विलास निंबोरकर, सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती