शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो संगणक परिचालक जिल्हा परिषदेवर धडकले

By admin | Updated: October 21, 2015 01:26 IST

संग्राम महाआॅनलाईन अंतर्गत जिल्ह्याच्या बाराही पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत संगणक परिचालकांचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे मानधन थकले आहे.

सहा महिन्यांचे मानधन थकीत : शंभूविधी गेडामला घातला घेरावगडचिरोली : संग्राम महाआॅनलाईन अंतर्गत जिल्ह्याच्या बाराही पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत संगणक परिचालकांचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे मानधन थकले आहे. जिल्हा समन्वयक व जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मानधन अदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र १५ दिवसांचा कालावधी उलटूनही संगणक परिचालकांना मानधन मिळाले नाही. अखेर संतप्त शेकडो संगणक परिचालकांनी मानधन मिळण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेवर धडक देऊन जिल्हा समन्वयक शंभूविधी गेडाम यांना पंचायत विभागात घेराव घातला. यावेळी संगणक परिचालक संघटना जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष नाहीद पठाण, सचिव संदीप बुरमवार, कोरची तालुकाध्यक्ष भुमेश्वर शेंडे, पवित्र मंडल साखर झाडे, राहूल मेश्राम, विजय मिसार आदीसह शेकडो संगणक परिचालक उपस्थित होते. गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत बाराही तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये महाआॅनलाइन संग्राम अंतर्गत एकूण ४६० संगणक परिचालक कार्यरत आहेत. या परिचालकांचे मानधन जि.प.च्या पंचायत विभागामधून महाआॅनलाईनचे जिल्हा समन्वयक शंभूविधी गेडाम यांच्या अधिनस्त करण्यात येते. जिल्ह्यातील ४६० संगणक परिचालकांचे मागील सहा महिन्यांचे मानधन प्रलंबित आहे. (स्थानिक प्रतिनिधी)