शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

७५ हेक्टरवर फळबाग लागवड

By admin | Updated: May 18, 2017 01:44 IST

महात्मा गांधी रोजगार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७७ शेतकऱ्यांनी ७४.६५ हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड केली आहे.

कृषी विभागाचे मार्गदर्शन : रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महात्मा गांधी रोजगार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७७ शेतकऱ्यांनी ७४.६५ हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड केली आहे. शासनाच्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात फळ लागवडीचे क्षेत्र वाढत चालले आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. एकूण क्षेत्राच्या सुमारे ८० टक्के क्षेत्र धान लागवडीसाठी वापरले जाते. मात्र दिवसेंदिवस धान लागवडीचा खर्च वाढत चालला आहे. त्या तुलनेत धानाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग इतर पिकांकडे वळत चालला आहे. शेतकऱ्यांना इतर पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी अनुदानही दिले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात यापूर्वी फळबागांची संख्या अत्यंत मर्यादित होती. मात्र कृषी विभागाच्या अनुदानानंतर फळबागांची संख्या वाढत चालली आहे. फळबागेसाठी दोन ते तीन वर्ष खर्च करावा लागतो. त्यानंतर बिनाखर्ची उत्पादन मिळण्यास सुरूवात होते. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी वर्ग फळबाग लागवडीकडे वळला आहे. २०१६-१७ या वर्षात फळबाग लागवडीचे १० हेक्टरचे लक्षांक देण्यात आले होते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रती झाड अनुदान देण्यात येणार होते. पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागितले असता, ४१८ शेतकऱ्यांची अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३९० शेतकऱ्यांना तांत्रिक मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्षात ७७ शेतकऱ्यांनी ७४.६५ हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांनी ५ हजार ४६१ फळझाडे लावली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने आंबा, चिकू, कागदी लिंबू, शेवगा, फणस व साग या पिकांचे चांगले उत्पादन होते. प्रयोगाअंती हे सिध्दही झाले आहे. शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केल्यानंतर त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित विभागातील कृषी सहाय्यकावर सोपविली जाते. फळबाग लागवडीवर अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनाही फळबागेची काळजी घेण्यास प्रोत्साहन मिळत आहे. दरवर्षी फळबागाची क्षेत्र वाढत चालले आहे. काही शेतकरी मात्र फळबागेतून मिळणारा अतिरिक्त नफा लक्षात घेऊन अनुदानाशिवाय फळबाग लावत आहेत.