शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे धरणे

By admin | Updated: August 21, 2016 02:32 IST

खासगी अनुदानित आश्रमशाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्या, या मागणीसाठी शिक्षक

निवेदन सादर : शिक्षक भारती आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे आंदोलनगडचिरोली : खासगी अनुदानित आश्रमशाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्या, या मागणीसाठी शिक्षक भारती गडचिरोली जिल्हा अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना सादर केले. अनुदानित आश्रमशाळेतील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने ८ जून रोजी काम नाही तर वेतन नाही, हा शासन निर्णय घेतला आहे. सदर शासन निर्णय अत्यंत अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्यात यावा, अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे, आश्रमशाळेत प्रवेशित २० ते ४० विद्यार्थी संख्या परिक्षण अनुदान व शिक्षक पदमान्यतेस ग्राह्य धरावी, निवासी विद्यार्थ्यांना बौद्धिक सुविधा व गुणवत्ता वाढण्यासाठी परिक्षण अनुदानात वाढ करावी, दर महिन्याच्या १ तारखेला वेतन द्यावे, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या कर्मचाऱ्यांना देण्यात याव्या आदी मागण्यांचा समावेश आहे.आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक भारती संघटनेचे विभागीय अध्यक्ष महादेव बासनवार, जिल्हाध्यक्ष सतीश पवार, विभागीय अध्यक्ष यादवराव धानोरकर, देविदास लांजेवार, सुनील अवसरे, सुधीर झंझाळ, सुधीर भोयर, महेश बोरेवार, संदीप भोयर, संगीता दर्रो यांनी केले. (नगर प्रतिनिधी)