शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर खासगी वाहनांचे अतिक्रमण वाढले

By admin | Updated: October 22, 2016 02:05 IST

गडचिरोली-नागपूर या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजुला खासगी प्रवासी वाहने दिवसभर उभी ठेवली जात आहेत.

आरमोरीतील स्थिती : अपघात वाढले, वाहनांमुळे रस्ते झाले अरूंदआरमोरी : गडचिरोली-नागपूर या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजुला खासगी प्रवासी वाहने दिवसभर उभी ठेवली जात आहेत. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या वाहनांचे अतिक्रमण हळूहळू रस्त्याच्या मधोमध येऊ लागले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. आरमोरी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असल्याने या मार्गावरून मालवाहू ट्रक, प्रवासी वाहने, बस, दुचाकी यांची नेहमीच वर्दळ राहते. शहराच्या मध्यभागी बसथांबा आहे. बसथांब्यापासून किमान ३०० मीटर अंतरावर खासगी वाहने उभी करू नये, असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाचे असले तरी हा नियम आरमोरी येथे धाब्यावर बसविला जात आहे. कधीकधी तर काळीपिवळी वाहने ज्या ठिकाणी बस थांबते, त्याच ठिकाणी उभी ठेवून प्रवाशी भरतात. त्यामुळे बसथांब्यापासून काही दूर अंतर नेऊन थांबवावी लागते. आरमोरी येथील वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी महिला व पुरूष अशा दोन स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र हे वाहतूक पोलीस सदर वाहनांवर कोणतीही कारवाई करीत नाही. परिणामी वाहनचालकांची हिंमत वाढत चालली आहे. या वाहनांचे अतिक्रमण हळूहळू रस्त्यावर येत आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणावरून प्रवाशांची उचल सदर वाहनधारक करीत असल्याने या ठिकाणी दिवसभर किमान १० काळीपिवळी वाहनांचा ठिय्या आहे. (शहर प्रतिनिधी)वाहतूक पोलीस व टॅक्सी चालकांचे साटेलोटेदिवसभर वाहनांचा मुख्य मार्गावरच ठिय्या राहत असतानाही वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करीत नाही. वाहनांच्या अतिक्रमणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरातून अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत असतानाही वाहतूक पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. यावरून काळीपिवळी वाहनचालक व वाहतूक पोलीस यांचे साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे.