शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हाणामारी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार

By admin | Updated: August 3, 2014 23:22 IST

देसाईगंज नगर पालिकेचे कर्मचारी अशोक माडावार व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्यात झालेल्या वाद व मारहाण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री

गडचिरोली : देसाईगंज नगर पालिकेचे कर्मचारी अशोक माडावार व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्यात झालेल्या वाद व मारहाण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस महानिरिक्षक यांना दिले आहे. १ आॅगस्ट रोजी या संदर्भात गृहमंत्र्यांनी आदेश निर्गमित केले असून या प्रकरणी माडावार यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मोटवानी यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. २४ जुलै रोजी मुख्य अधिकारी विनोद जाधव यांच्याकडे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी गेले असताना त्यांच्या कक्षात कर्मचारी अशोक माडावार आलेत व त्यांनी मोटवानी यांच्याशी वाद घातला. या प्रकरणात माडावार व मोटवानी दोघानीही पोलिसात तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच मुख्याधिकारी यांनीही तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मोटवानी यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करून माडावार यांच्यावर बडतर्फची कारवाई करावी व मुख्याधिकारी जाधव यांनी केलेल्या खोट्या तक्रारीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्र्यांनी पोलीस महानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र यांना या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मोटवानी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपल्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. एखाद्या कनिष्ठ कर्मचाऱ्याने उच्च अधिकाऱ्याच्या कक्षात येऊन गैर वर्तवणूक करणे हे नियमबाह्य आहे. मुख्याधिकारीही माडावार यांना घाबरतात. (प्रतिनिधी)