वासेकर यांनी म्हटले आहे की, गटारासाठी खोदण्यात आलेले खड्डे कुठे खाली तर कुठे वर आहेत. वापरण्यात येत असलेले पाईप हलक्या दर्जाचे असून त्यातच नगरपरिषदेने रस्ता बांधकाम सुरू केले असून कामात लेव्हल मेंटनन होत नसल्याने रहदारीला ही मोठी अडचण निर्माण हाेत आहे. जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक सिंगला आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहाेड यांच्याकडे तक्रारी देऊन वारंवार तोंडी व लेखी कळविले. मात्र अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने कंत्राटदाराला एक प्रकारे अभय मिळाले आहे. त्यामुळे कंत्राटदार मनमानीपणा करून कामात मोठा मलिदा लाटल्याचे दिसून येत असल्याने यात अधिकारी व पदाधिकारी गुंतल्याचा संशय व्यक्त करीत तत्काळ कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी रवींद्र वासेकर यांनी केली आहे.
शहरातील गटार लाईन कामाची उच्चस्तरीय चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST