शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

येथे विजयादशमीला केली जाते रावणाची पूजा, आदिवासींची श्रद्धा, पारंपरिक पुजेसह गावातून काढतात मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 18:45 IST

रामायणकाळातील राजा रावणाची विविध इष्ट-अनिष्ट रूपे सर्वज्ञात आहेत. या रूपानुसार प्रत्येकाच्या मनात राजा रावणाविषयी वेगवेगळ्या प्रतिमा तयार झाल्या आहेत. अयोध्येचे राजपुत्र राम यांची पत्नी सीतेचे हरण करणारा लंकेचा राजा रावण हा वाईट प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून विजयादशमीच्या दिवशी त्याच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा सर्वत्र आहे.

- गोपाल लाजूरकर  गडचिरोली -  रामायणकाळातील राजा रावणाची विविध इष्ट-अनिष्ट रूपे सर्वज्ञात आहेत. या रूपानुसार प्रत्येकाच्या मनात राजा रावणाविषयी वेगवेगळ्या प्रतिमा तयार झाल्या आहेत. अयोध्येचे राजपुत्र राम यांची पत्नी सीतेचे हरण करणारा लंकेचा राजा रावण हा वाईट प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून विजयादशमीच्या दिवशी त्याच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा सर्वत्र आहे. मात्र दुसरीकडे राजा रावणाच्या शौर्याची गाथा गाऊन पूजन करण्याची परंपरा गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांत जोपासली जाते. विजयादशमीला मोठय़ा आदरभावाने या गावांमध्ये आदिवासी बांधव रावण महोत्सव साजरा करतात.जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील परसवाडी (दुधमाळा), धानोरा, कन्हाळगाव, रांगी, येरकडटोला, महावाडा, आरमोरी तालुक्यातील वानरचुवा, गडचिरोली तालुक्यातील चांदाळा, अहेरी तालुक्यातील कमलापूर, कोसेगुडम, मेडपल्ली, कुरखेडा तालुक्यातील मालदुगी तसेच कोरची आदी प्रमुख गावांसह इतर काही लहान गावांमध्ये विजयादशमीच्या दिवशी रावण महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी आदिवासी बांधव राजा रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर प्रतिष्ठापणा करून पारंपरिक पूजा केली जाते. विशेष म्हणजे याप्रसंगी अर्जी म्हणजेच प्रार्थना केली जाते. आदिवासींचा राजा रावण हा भाव मनात ठेवून पारंपरिक गीतांमधूनही राजा रावणाच्या शूरतेचा व पराक्रमाचा गुणगौरव केला जातो.गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव मंदिरराजा रावणाप्रती आदिवासी बांधवांची अपार ङ्म्रद्धा आहे. या ङ्म्रद्धेतूनच धानोरा तालुक्यातील परसवाडी (दुधमाळा) येथे 1991 मध्ये राजा रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या गावात दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी रावण महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात शरणपथ, कर्नाटक राज्यातील हम्पी विद्यापीठात रावणाची मूर्ती आहे. तसेच मध्यप्रदेशातील मंदसौर येथे राजा रावणाचे मंदिर आहे. या मंदिरातील राजा रावणाच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता यावे याकरिता विजयादशमीच्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. विशेष म्हणजे, राजा रावणाचा व अनिष्ट प्रवृत्तींचा धिक्कार विजयादशमीच्या दिवशी केला जात असला तरी दक्षिण भारतात तामिळनाडू राज्यात रावणाचे 352 मंदिर आहेत, असे आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक सांगतात.आदिवासींचा समज व धारणाराजा रावण शूर-पराक्रमी, संगीत पारंगत, विद्वान न्यायनिष्ट राजा होता. आदिवासी साहित्यात त्याला पूजनीय स्थान आहे. या स्थानामुळेच राजा रावणाला आदिवासी आपले दैवत मानतात. परंतु वैदिक साहित्यात रावणाच्या महिमेचे विदृपीकरण केले असल्याने समाजात राजा रावणाबद्दल अनिष्ट संदेश गेला, असल्याचे आदिवासी साहित्यिक नंदकिशोर नैताम यांचे म्हणणो आहे. दुष्ट अथवा अनिष्ट हे प्रतिक राजा रावणाच्या महिमेवर भारी पडले. असे असले तरी शूर, पराक्रमाचे प्रेरणास्थान या रुपाने आदिवासी राजा रावणाला आपले दैवत मानतात असे त्यांनी सांगितले.आज लाकडी मूर्तीची होणार स्थापनाकुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथे यंदाच्या रावण महोत्सवात 3क् सप्टेंबरला होणार आहे. यंदा प्रथमच राजा रावणाची प्रतिमा लाकडावर कोरून सदर मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. पहांदीपारी कुपार लिंगो गोंडी धर्म महासंघ शाखा मालदुगीच्या वतीने लाकडी मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे.

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७