शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्याच्या आजारी मुलास उपचारासाठी मदत

By admin | Updated: April 23, 2017 01:29 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी विविध

खाकीतील माणुसकी कायम : पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात केले दाखल धानोरा : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी विविध गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा करून तेथील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाच अभियानाअंतर्गत धानोरा पोलिसांनी नक्षल दलम उपकमांडरच्या आजारी मुलास धानोरा व गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात भरती करून माणुसकीचा परिचय दिला. नक्षलविरोधी अभियानादरम्यान धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील मर्केगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान गावातील प्रदीप रैनू दुगा हा ७ वर्षीय मुलगा खूप दिवसांपासून आजारी असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. अधिक चौकशी केली असता सदर आजारी मुलगा हा टिपागड नक्षल दलमचा उपकमांडर पंकज ऊर्फ रैनू बहादूर दुगा यांचा असल्याचे समजले. नक्षल दलम उपकमांडरचा मुलगा असल्याबाबतचा कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी प्रदीप दुगा याला औषधोपचारासाठी प्रथम धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले. येथे त्याच्यावर उपचार करण्यात आला. पुढील उपचारासाठी प्रदीपला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी निदानाअंती प्रदीप दुगा याला सिकलसेल हा आजार असल्याचे नि:ष्पन्न झाले. डॉक्टरांच्या मदतीने प्रदीपवर उपचार सुरू आहे. नक्षलविरोधी अभियान राबवित असताना त्यांच्या कुटुंबाविषयी पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (तालुका प्रतिनिधी)