शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा आॅक्सिजनवर

By admin | Updated: August 31, 2015 01:15 IST

नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागात रिक्तपदांचे ग्रहण कायम आहे.

रुग्णांची हेळसांड : वर्ग ३ व ४ ची २२६ पदे रिक्त गडचिरोली : नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागात रिक्तपदांचे ग्रहण कायम आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय मिळून वर्ग ३ व ४ ची एकूण तब्बल २२६ पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे शहरी भागातील आरोग्य सेवा आॅक्सिजनवर असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात वर्ग ३ व ४ ची मिळून एकूण ६९२ पदे मंजूर आहेत. यापैकी ४६६ पदे भरण्यात आली आहे. तर तब्बल २२६ पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. रिक्त असलेल्या वर्ग ३ मध्ये परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची मिळून एकूण १४४ पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग ३ ची २०० पदे मंजूर आहेत. यापैकी १२२ पदे भरण्यात आली असून तब्बल ७८ पदे रिक्त आहेत. अशाच प्रकारे अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आठ, आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात चार, कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात १० व भामरागड उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांची तब्बल १२ पदे रिक्त आहेत. सिरोंचाच्या ग्रामीण रुग्णालयात वर्ग ३ ची दोन, धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात पाच, एटापल्ली तीन, चामोर्शी दोन, कोरची सहा, मुलचेरा सहा, देसाईगंज दोन व आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात सहा पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग ४ ची एकूण २५८ पदे मंजूर आहेत. यापैकी १७६ पदे भरण्यात आली असून ८२ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्हा क्षयरोग केंद्रातही पदे रिक्त आहेत. वर्ग ३ व ४ ची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. रिक्तपदांमुळे कार्यरत वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा भार सोसावा लागत आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी वर्ग ३ व ४ ची पदभरती करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन व तयारी सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.