शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

चिरंतर विकासासाठी वैज्ञानिकवृत्ती बाळगा

By admin | Updated: December 20, 2014 01:33 IST

कोणतीही गोष्ट पूर्णत: समजल्याशिवाय ती गोष्ट व्यक्तीला आत्मसात करता येत नाही. विज्ञानाचे अनेक फायदे व तोटे आहेत.

गडचिरोली : कोणतीही गोष्ट पूर्णत: समजल्याशिवाय ती गोष्ट व्यक्तीला आत्मसात करता येत नाही. विज्ञानाचे अनेक फायदे व तोटे आहेत. त्यामुळे दैनंदिन आयुष्य सुकर व सुखद करण्यासाठी विज्ञान समजणे गरजेचे आहे. त्यामुळे चिरंतर विकासासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक वृत्ती बाळगावी, असे आवाहन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी केले. विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील कारमेल हायस्कूलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे तर अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, महिला व बाल कल्याण सभापती सुवर्णा खरवडे, जि.प. सदस्य रेखा मडावी, नंदा दुर्गे, पुनम गुरनुले, जयमाला पेंदाम, शांता परसे, मनोहर पोरेटी, पद्माकर मानकर, अशोक इंदूरकर, अमोल मारकवार, प्राचार्य अ‍ॅनिस मैथू, शिक्षणाधिकारी उल्हास नरड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभापती अतुल गण्यारपवार, विश्वास भोवते, सुवर्णा खरवडे, जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट आदींनी विज्ञान व तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी नरड तर संचालन मनोज उईके यांनी केले.