शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

हातपंपाचे पाणी पोहोचले घरांत

By admin | Updated: August 5, 2014 23:26 IST

आंध्रप्रदेशात गडचिरोली मॉडेल म्हणून नावारूपास आलेली दुहेरी पंप योजना गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत यशस्वीपणे राबविली जात आहे. या योजनेने ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील माठाचे

गडचिरोली : आंध्रप्रदेशात गडचिरोली मॉडेल म्हणून नावारूपास आलेली दुहेरी पंप योजना गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत यशस्वीपणे राबविली जात आहे. या योजनेने ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील माठाचे ओझे कमी केले आहे. आजमितीस जिल्ह्यात सुमारे ४०१ योजनांपैकी ३०० योजना सुरू आहेत तर काहींचे बांधकाम सुरू आहेत. ५० ते १०० लोकवस्ती असलेल्या गावाला मोठ्या नळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. शासनाने पाणी पुरवठा योजना सुरू केली तरी ती चालविणे ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे १०० लोकवस्तीपर्यंतच्या गावात नळ योजना नसल्याने गाववासीयांना प्रचंड पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागत होता. पाण्याने भरलेले हंडे वाहण्यासाठीच महिलांची बरीच शक्ती खर्च होत होती. या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाद्वार हातपंपावरच मोटारपंप बसवून मोटारपंपाच्या सहाय्याने सदर पाणी टाकीत टाकण्यात येते. त्यानंतर टाकीतील पाणी सभोवतालच्या नागरिकांच्या घरापर्यंत नळाद्वारे पोहचविण्यात येते. एकंदरीतच ही योजना मोठ्या नळ योजनेप्रमाणेच कार्य करते. ही योजना कार्यान्वीत करण्यासाठी फक्त २.५ लाख रूपये खर्च येतो. हा सर्व खर्च राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत भागविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ही योजना २००८-०९ पासून राबविण्यात येत आहे. जवळपास ही योजना ३०० गावांमध्ये यशस्वीपणे सुरू आहे. तर १०० गावांमध्ये या योजनेचे काम प्रगतीपथावर आहेत. ५ वर्षापर्यंत देखभाल व दुरूस्तीचा खर्च कंत्राटदाराकडे सोपविण्यात आला आहे. ज्या गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. त्या महिलांच्या घरापर्यंत दुहेरी पंप योजनेद्वारे पाणी पोहचले आहे. याचा आनंदही महिला व नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. ही योजना यशस्वी होईल की नाही या विषयी ग्रामस्थ शांसक असल्याने सुरूवातीला ही योजना राबविण्यास ग्रामपंचायती तयार नव्हत्या. मात्र याचे फायदे लक्षात आल्यानंतर ही योजना सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. यासाठी लहान पंप वापरला जात असल्याने यासाठी विद्युत बिलही कमी येते, सदर बिल भरणे ग्रामपंचायतीला सहज शक्य होणे हेच खरे या योजनेचे यश असल्याचे अधिकारी व गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)