शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

बँकेच्या रांगेतील वृध्दांना मदतीचे चिमुकले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 01:58 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी १००० व ५०० च्या नोटा बाद केल्या.

नोटा बंदीत बँकेत दिली सेवा : प्लॅटीनम ज्युबिली शाळेचा उपक्रमगडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी १००० व ५०० च्या नोटा बाद केल्या. त्यानंतर देशभरातील बँकांमध्ये या नोटा जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या. ही परिस्थिती गडचिरोली शहरातील अनेक बँकात दिसून आली. या गर्दीत वृध्द महिला, पुरूष तसेच ग्रामीण भागातून आलेले अशिक्षीत नागरिक यांचाही समावेश होता. या नागरिकांच्या मदतीसाठी प्लॅटीनम ज्युबिली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सरसावले. गेल्या १० दिवसांपासून हे विद्यार्थी भारतीय स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये जाऊन अशा आबाल वृध्द ग्राहकांना पावती भरण्यासाठी मदत करीत आहे. त्यांच्या कागदपत्राच्या झेरॉक्सही काढून आणून देण्यासाठी या विद्यार्थ्यांची मदत आबाल वृध्द व अशिक्षीत ग्राहकांना होत आहे. अनेक ग्राहकांना बँकेत गेल्यावर जुने चलन जमा करण्यासाठी कोणते फार्म भरावे लागतात याची माहिती नाही. हे शाळकरी मुले सदर नागरिकांना मदत देत आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी ग्राहकांना शुध्द पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देण्याचे काम या विद्यार्थ्यांनी केले. बँकांच्या शाखांमध्ये या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचा फलक लावून वई आॅफर अवर हेल्प असा संदेश लिहिला आहे. बँकेत येणाऱ्या अशा ग्राहकांना सदर विद्यार्थी गर्दीत सेवा देत आहे. शाळेचे मुख्याध्यापक रहिम अमलानी यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. बँकातील गर्दी आटोक्यात येईपर्यंत आबाल वृध्द ग्राहक, महिला ग्राहक आदींना हे विद्यार्थी मदत देतील, अशी माहिती रहिम अमलानी यांनी लोकमतशी बोलताना शुक्रवारी दिली. जवळजवळ गेल्या १० दिवसात ५०० वर अधिक ग्राहकांना या विद्यार्थ्यांकडून सेवा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.