लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तान्हा पोळा सणाच्या दिवशी प्रवासी मिळत नसल्याचा अनुभव लक्षात घेऊन गडचिरोली आगारातील निम्म्या बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. एरवी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांच्या गर्दीने गजबजणाºया गडचिरोलीच्या बसस्थानकात मंगळवारी दिवसभर शुकशुकाट पसरला होता.गडचिरोली आगारातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तसेच नागपूर, चंद्रपूर व इतर लांब पल्ल्यांच्या बसेस सोडल्या जातात. बसस्थानकातून दर दिवशी १०३ बसफेºया सोडल्या जातात. यामध्ये नागपूरच्या १९ बसफेºया व लांब पल्ल्याच्या ११ बसफेºयांचा समावेश आहे. तान्हापोळ्याच्या दिवशी नागरिक सहजासहजी गावाच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे एसटीला प्रवाशी मिळत नाही. त्याचबरोबर तान्हापोळाच्या दिवशी बहुतांश चालक, वाहक सुट्यांचे अर्ज टाकून पसार होतात. हा दरवर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने यावर्षीही बसफेºया रद्द करण्याचा निर्णय एसटी विभागाने घेतला. सोमवारीही सायंकाळचे २४ शेड्युल रद्द करण्यात आले होते. तर मंगळवारी ४८ शेड्युल रद्द झाले. रद्द झालेल्या बहुतांश शेड्युलमध्ये ग्रामीण भागातील शेड्युलचा समावेश आहे. नागपूर, चंद्रपूर तसेच लांब पल्ल्यांच्या बसेसचे संपूर्ण शेड्युल सोडण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना कोणतीही अडचण जाणवली नाही.खासगी वाहतूकही ठप्पमंगळवारी खासगी वाहतुकही पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे आकस्मिक स्थितीत घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. बसस्थानकावर एक ते दोन तास बसची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यातच गडचिरोली येथील बाजारपेठ, हॉटेल बंद असल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली.
निम्म्या बसफेºया रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:57 IST
तान्हा पोळा सणाच्या दिवशी प्रवासी मिळत नसल्याचा अनुभव लक्षात घेऊन गडचिरोली आगारातील निम्म्या बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत.
निम्म्या बसफेºया रद्द
ठळक मुद्देतान्हा पोळ्याचे निमित्त : अनेक प्रवाशांची फजिती