शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज शहरात मोकाट जनावरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:19 IST

देसाईगंज शहर हे व्यापारीदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण आहे. मुख्य राष्ट्रीय महामार्गाने लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याशी जोडल्या गेले ...

देसाईगंज शहर हे व्यापारीदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण आहे. मुख्य राष्ट्रीय महामार्गाने लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याशी जोडल्या गेले असल्याने या मार्गांवरुन नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. शहरातील अनेक पशुपालक जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडून देत असतात. सदर जनावरे दिवसा भाजीपाला बाजारात टाकून दिलेल्या टाकाऊ भाजीपाल्यावर ताव मारण्यासह चक्क भाजीपाल्याच्या दुकांनावरही तोंड मारत असल्याने हाकलण्याचा प्रयत्न केला असता धुमाकूळ घालत असल्याने भाजीपाला विक्रेत्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

रात्रीच्या वेळेला मोकाट जनावरे राष्ट्रीय महामार्गावर घोळक्याने बस्तान मांडून बसत असल्याने अनेकदा मुख्य मार्गांवरील वाहतुकीचा खोळंबा होते. दरम्यान, गंभीर अवस्थेत रुग्णवाहिकेने रुग्णाला अतितत्काळ सेवेत हलविण्यात येत असताना मुख्य मार्गांवर बस्तान ठोकून बसलेल्या जनावरांमुळे मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे गंभीर रुग्णास वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितास धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

नगर परिषद प्रशासनाने या बाबीची तत्काळ दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास व अनुचित घटना घडल्यास घडलेल्या घटनेस नगर प्रशासनास सर्वस्वी जबाबदार धरून आंदोलन करण्याचा इशारा शहरातील सुजाण नागरिकांनी दिला आहे.

310821\img_20210831_081359.jpg

देसाईगंज शहराच्या हुतात्मा स्मारकासमोर राज्यमहामार्गावर असतात जनावरे बसुन.