शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुडेल्लीवारांनी डागली स्वपक्षीयांविरोधात तोफ

By admin | Updated: October 11, 2015 02:36 IST

नाग विदर्भ आंदोलन समितीचे युवा कार्यकर्ते व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे जवळचे कार्यकर्ते ....

सोशल मीडियावर भावना : अहेरीचा रागरंगअहेरी : नाग विदर्भ आंदोलन समितीचे युवा कार्यकर्ते व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे जवळचे कार्यकर्ते अमोल गुडेल्लीवार यांनी अहेरी नगर पंचायतमध्ये प्रभाग क्र. ११ मधून उमेदवारी न मिळाल्याने स्वपक्षीयांविरोधात सडेतोड तोफ डागली आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे कान आपल्या विरोधकांनी भरले व आपल्याविषयी दिशाभूल करणारी माहिती देऊन शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी कापण्यात आली. याचा अत्यंत दु:ख व वेदना आपल्याला आहे, अशी भावना त्यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे. अमोल गुडेल्लीवार यांनी म्हटले आहे की, अहेरी नगर पंचायतीसाठी अखेरच्या दिवशी आपण अतिशय दु:खाने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला नाईलाज होता. गेल्या अनेक वर्षांपासून मी ज्या पक्षासाठी नि:स्वार्थपणे काम केले. कोणतीही निवडणूक असो, पक्षाचा मेळावा असो, दरवर्षी आयोजित होणारे क्रिकेट टुर्नामेंट असो किंवा राजांचा एखादा खासगी कार्यक्रम असो तो यशस्वी व्हावा म्हणून नेहमीच कठोर मेहनत केली. पक्षाच्या वाढीसाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले. पक्षाकडून फक्त नगर पंचायत निवडणुकीत माझ्या समाजाचे बहुसंख्य मतदार असणारा व सर्वसामान्य प्रवर्गासाठी राखीव असलेला प्रभाग क्र. ११ कन्यका मंदीर वॉर्डातून आपण उमेदवारी मागितली. या प्रभागासाठी आपण सर्व दृष्टीने योग्य उमेदवार होतो व जिंकण्याची पूर्ण शक्यता होती. परंतु पक्षांतर्गत काही विरोधकांनी राजांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली व माझी उमेदवारी अखेरच्या क्षणाला कापण्यात आली. गेले दोन दिवस माझ्या जीवनातील सगळ्यात कठीण क्षणाचे होते. परंतु या ठिकाणी आपण थांबलो तर आपण संपलो, म्हणून मला माझी पात्रता सिद्ध करण्यासाठी व पक्षाअंतर्गत विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी उमेदवारी दाखल करावी लागली व अपक्ष निवडणूक लढून आपला फैसला जनतेवर सोपविला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. एकूणच गुडेल्लीवारांच्या या पावित्र्याने निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनाही मोठा तडाखा बसण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)