शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

हरित सेना बस आलापल्लीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 01:28 IST

वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हरीत सेना बस तयार केली असून

वृक्ष लागवडीबाबत जनजागृती : पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी आलापल्ली : वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हरीत सेना बस तयार केली असून सदर बस बुधवारी आलापल्लीत दाखल झाली. सदर बसला पुढच्या प्रवासासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी हिरवी झेंडी दाखविली. पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने ठेवले आहे. सदर उपक्रम तीन टप्प्यात राबविला जाणार आहे. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वन विभाग, ग्राम पंचायत मिळून ४ कोटी वृक्षांची लागवड करणार आहे व इतर विभाग ७५ लाख वृक्ष लावणार आहेत. २०१८ मध्ये १३ कोटी व २०२१ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठरविण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व नागरिकांना कळावे व नागरिकांनी स्वत:हून वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाने हरीत सेना (ग्रीन आर्मी) ही बस तयार केली आहे. ही बस प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हरीत सेना प्रतिनिधींची नोंदणी करणार आहे. बसच्या मागच्या बाजूस मोठी एलईडी टीव्ही लावण्यात आली आहे. या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीची माहिती दिली जात आहे. गाडीच्या आतील भाग वातानुकुलीत असून २० एलईडी टीव्ही लावण्यात आल्या आहेत. वन विभाग महाराष्ट्र शासन असे लिहिलेली पांढऱ्या शुभ्र रंगाची बस आलापल्लीत दाखल होताच सदर बस पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बस आल्यानंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. आलापल्लीवरून सदर बस पुढच्या प्रवासासाठी निघाली. (प्रतिनिधी)