शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

४१ जागांसाठी ग्रा.पं. निवडणूक

By admin | Updated: October 30, 2014 22:51 IST

राज्य निवडणूक आयोगाने २७ आॅक्टोबर २०१४ रोजी पत्र काढून राज्यभरासह जिल्ह्यातील डिसेंबर २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

गडचिरोली : राज्य निवडणूक आयोगाने २७ आॅक्टोबर २०१४ रोजी पत्र काढून राज्यभरासह जिल्ह्यातील डिसेंबर २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीमध्ये १६ प्रभागात ३४ जागांसाठी पोट निवडणूक होणार आहे. तसेच धानोरा तालुक्यातील कोंदावाही या एकमेव ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागातील सात जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत. यापैकी एका ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबर २०१४ मध्ये संपणार आहे. तर ग्रा.पं. सदस्यांच्या जागा रिक्त झालेल्या कुरखेडा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीमध्ये २३ नोव्हेंबर रोजी पोट निवडणुका घेण्यात येणार आहे. धानोरा तालुक्यातील कोंदावाही या एकमेव ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून या ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागातील सात सदस्यांच्या जागांसाठी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. कुरखेडा तालुक्यातील पुराडा, शिवणी, दादापूर, तळेगाव, धनेगाव, आंधळी (सोनसरी), घाटी, कातवाडा, रानवाही, खोब्रामेंढा आदी १० ग्रामपंचायतीमध्ये १६ प्रभागातील ३४ जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी पोट निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी जिल्हा व ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केली आहे. आतापासूनच मतदार यादी, छायाचित्र आदींचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. प्राप्त झालेल्या नाम निर्देशन पत्राची छाननी १० नोव्हेंबर २०१४ रोजी होईल. त्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर निवडणूक विभागामार्फत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. २३ नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे, २४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. आरक्षित जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या अनुसूचित जमाती, जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर ग्रा.पं. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे कर्मचारी कामाला लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)