लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कुंजेमर्का येथील ग्रामस्थांनी पोलीस अधिकाºयांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी गट्टा येथील पोलीस मदत केंद्रात येऊन त्यांच्याकडील तीन भरमार बंदुका व एक भरमार रायफल जमा केली.हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत भोसले यांच्या उपस्थितीत कुंजेमर्का गावात बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांच्याकडील बंदुका पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन अधिकाºयांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कुंजेमर्कावासीयांना गट्टा पोलीस मदत केंद्रात येऊन त्यांच्याकडील बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या. यावेळी गट्टाचे प्रभारी अधिकारी योगेश दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल खंडारे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस मदत केंद्राच्या वतीने ग्रामस्थांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. इतर ग्रामस्थांनी सुद्धा कुंजेमर्कावासीयांचा आदर्श घेऊन नक्षलविरोधी अभियानात सामिल व्हावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केले आहे.
ग्रामस्थांनी बंदुका केल्या जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:44 IST
एटापल्ली तालुक्यातील कुंजेमर्का येथील ग्रामस्थांनी पोलीस अधिकाºयांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी गट्टा येथील पोलीस मदत केंद्रात येऊन त्यांच्याकडील तीन भरमार बंदुका व एक भरमार रायफल जमा केली.
ग्रामस्थांनी बंदुका केल्या जमा
ठळक मुद्देकुंजेमर्कावासीयांचा पुढाकार : पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद