शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

ग्रामसभांना २७ कोटी मिळणार

By admin | Updated: March 27, 2016 01:38 IST

पेसा कायद्यांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांनी वन विभागामार्फत पहिल्या फेरीत पर्याय क्रमांक एक नुसार पेसा क्षेत्रातील ...

पहिली फेरी : पेसा अंतर्गत ७३ तेंदू युनिटची विक्रीदिलीप दहेलकर गडचिरोलीपेसा कायद्यांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांनी वन विभागामार्फत पहिल्या फेरीत पर्याय क्रमांक एक नुसार पेसा क्षेत्रातील एकूण ७३ तेंदू युनिटपैकी ६३ तेंदू युनिटची विक्री लिलाव प्रक्रियेतून कंत्राटदारांना केली आहे. यातून ग्रामसभांना एकूण २७ कोटी ४० लाख ७ हजार ३५४ रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. सदर रक्कम सहा महिन्यानंतर संबंधित ग्रामसभांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.गडचिरोली प्रादेशिक वनवृत्त कार्यालयांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, वडसा, आलापल्ली, भामरागड व सिरोंचा हे पाच वन विभाग आहेत. या पाचही वन विभागांतर्गत पेसा क्षेत्रातील व पेसा बाहेरचे मिळून एकूण १६० तेंदू युनिट आहेत. पेसा कायद्यान्वये संबंधित गावातील ग्रामसभांना त्या गावाच्या जंगलातील तेंदू, मोहफूल आदींसह इतर वनोपजांचे व्यवस्थापन, विक्री करण्याचा अधिकार शासनाने प्रदान केला आहे. या अधिकाराचा वापर करून जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील ग्रामसभा गतवर्षीपासून तेंदू संकलनाच्या व्यवस्थापनाचे काम करीत आहेत. गडचिरोली वनवृत्तांतर्गत जिल्ह्याच्या पाचही वन विभागातील पेसा क्षेत्राच्या हद्दीतील एकूण ७३ तेंदू युनिटसाठी वन विभागाने ग्रामसभांना आवाहन केले होते. या तेंदू घटकातील तेंदू संकलनाचे व्यवस्थापन व विक्री करण्यासाठीचा प्रस्ताव अनेक ग्रामसभांनी जिल्हा परिषद व वन विभागाकडे सादर केला. त्यानंतर वन विभागाने पेसा क्षेत्रातील ७३ तेंदू युनिटसाठी लिलाव प्रक्रिया निश्चित केली. पेसा क्षेत्रातील ग्रामसभांनी शासनाने सुचविलेल्या पर्याय क्रमांक एकची निवड करून ६३ तेंदू युनिटची वन विभागामार्फत कंत्राटदारांना विक्री केली. या संदर्भातील लिलाव प्रक्रिया वन विभागाच्या मार्गदर्शनात १७ व १८ मार्च २०१६ रोजी पार पाडण्यात आली. ६३ तेंदू युनिटमध्ये एप्रिल व मे महिन्यात तेंदू संकलनाचे काम करण्यात येणार आहे. तेंदू संकलनासाठी सध्या खुट कटाईचे काम जोमात सुरू आहे.पर्याय क्रमांक २ नुसार स्वबळावर तेंदू संकलनवन विभागामार्फत पेसा क्षेत्रातील तेंदू युनिटमधील तेंदू संकलन, व्यवस्थापन व विक्री करण्याचा अधिकार पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना प्रदान करण्यात आला आहे. यासाठी वन विभागाने ग्रामसभांपुढे पर्याय क्रमांक एक व पर्याय क्रमांक दोन ठेवले आहेत. संबंधित ग्रामसभांनी पर्याय क्रमांक दोनची निवड केल्यास संबंधित ग्रामसभा सदर तेंदू युनिटची स्वत: स्वबळावर विक्री करू शकतात. तसेच संबंधित तेंदू युनिटचे व्यवस्थापन स्वत: करू शकतात. पर्याय क्रमांक दोनमध्ये ग्रामसभांच्या कामात वन विभाग हस्तक्षेप करू शकत नाही. गतवर्षीही ग्रामसभा झाल्या मालामाल२०१५ च्या तेंदू हंगामात जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील अनेक ग्रामसभांनी पेसा क्षेत्राच्या हद्दीतील तेंदू युनिटचे संकलन, व्यवस्थापन व विक्री वन विभागाच्या सहकार्यातून केली होती. गतवर्षीसुध्दा ग्रामसभांनी कंत्राटदारांना विकलेल्या तेंदू युनिटला चांगली किमत मिळाली होती. त्यामुळे अनेक ग्रामसभा आर्थिकदृष्ट्या मालामाल झाल्या. याशिवाय बांबूच्या व्यवस्थापन व विक्री मधून जिल्ह्यातील २० ग्रामसभांनी लाखो रूपयांचे उत्पन्न मिळविले होते. पेसा कायद्यामुळे त्या क्षेत्रातील ग्रामसभा आर्थिकदृष्ट्या बळकट होत आहेत.