शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

हरभरा पिकाने आदिवासींना दिली जगण्याची ऊमेद

By admin | Updated: April 5, 2015 01:51 IST

सिंचनाची सुविधा नाही म्हणून जमीन पडीत ठेवणाऱ्या भामरागड, एटापल्ली या नक्षलग्रस्त भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी ....

दिगांबर जवादे गडचिरोलीसिंचनाची सुविधा नाही म्हणून जमीन पडीत ठेवणाऱ्या भामरागड, एटापल्ली या नक्षलग्रस्त भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी यावर्षी पहिल्यांदाच दीड हजार पेक्षा अधिक हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड केली. आधीच सुपीक असलेल्या जमिनीत अत्यंत कमी खर्चात व श्रमात हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन झाले. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन मिळाले असून यामुळे जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके आदिवासीबहुल व नक्षलदुष्ट्या अतिशय संवेदनशील मानले जातात. केंद्र व राज्य शासन शेकडो योजनांच्या माध्यमातून या क्षेत्रात पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहे. या भागातील शेतकऱ्यांना सोलर पंप, डिझेल इंजिन, वीज पंप, विहीर, कुपनलिका उपलब्ध करून देण्यासाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. यातील अर्धेअधिक साधने अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने हडप केली जाऊन अनुदानाची रक्कम परस्पर लाटल्या जात असल्याचीही परिस्थिती आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विहीर असली तरी शेतात मात्र विहिरीचा पत्ता नसल्याचे अनेक प्रकरणे दिसून आली आहेत.सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने रबी पिकांचे उत्पादन घेणे अशक्य असल्याचा समज निर्माण झाला असल्याने सदर शेतकरी कोणत्याही रबी पिकाचे उत्पादन घेत नव्हते. एवढेच नाही तर हरभरा, गहू, ज्वारी, जवस, तीळ यासारख्या रबी पिकांचे उत्पादन घेण्यास आपली जमीन सुपीक नसल्याचा गैरसमजही पसरला होता. त्यामुळे धान पिकानंतर जमीन पडीत राहत होती. धान पीकही बेभरवशाचे असल्याने या भागातील शेतकरी कायमचा चिंतेत पडला होता. कृषी विभागाने यावर्षी या दोन्ही तालुक्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर या भागातील जमीन हरभरा पिकासाठी अत्यंत सुपीक असल्याचे निष्पन्न झाले. हरभरा पिकाला जलसिंचनाची अजिबात आवश्यकता नसून रासायनिक खतांचा वापर करावा लागत नसल्याने लागवडीचा खर्चही अत्यंत कमी असल्याचे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर येथील शेतकरी हरभरा पिकाच्या लागवडीस तयार झाला. एटापल्ली व भामरागड या दोन तालुक्यात यावर्षी पहिल्यांदाच दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली. हरभऱ्याचे बियाणे कृषी व पोलीस विभागाने १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले. पिकाची लागवड झाल्यानंतर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी किडीचा प्रतिबंध, सेंद्रिय खताचा वापर व पिकाची घ्यावयाची इतर काळजी याबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. आधीच सुपीक असलेल्या जमिनीत हरभऱ्याचे पीक अपेक्षा नव्हती, एवढ्या जोमाने वाढले. हरभऱ्याचे पीक पाहून या भागातील आदिवासी शेतकरी, पोलीस विभागाचे कर्मचारी व कृषी विभागाचे अधिकारीही आश्चर्यचकीत झाले. कृषी विभागाच्यामार्फतीने करण्यात आलेल्या नजरअंदाज पाहणी अहवालावरून या भागात हेक्टरी सहा क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली असून हरभऱ्याचा दर्जा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगला असल्याने त्याला बाजारपेठेत अधिक भाव मिळेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे. आजपर्यंत पडीत राहणाऱ्या जमिनीतून २० हजार रूपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध झाल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. यावर्षीच्या प्रयोगानंतर पुढच्या वर्षी हरभरा लागवडीच्या क्षेत्रात दुपटीने वाढ होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.