शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

धान्य साठवणुकीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:09 IST

आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेले धान्य सुरक्षित राहावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआधारभूत धान खरेदी : ७३ हजार क्विंटल क्षमतेची गोदामे उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेले धान्य सुरक्षित राहावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे ७३ हजार क्विंटल साठवणुकीची क्षमता असलेले गोदाम उपलब्ध करून दिले जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात महाराष्टÑ स्टेट को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडची बिगर आदिवासी क्षेत्रात मुख्य अभिकर्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गडचिरोली धान खरेदी केंद्राअंतर्गत पाच हजार क्विंटल धान्य साठवणुकीची क्षमता असलेले गोदाम आहे. आरमोरी येथे तीन हजार क्विंटल साठवणूक क्षमतेचे गोदाम आहे. त्याचबरोबर देसाईगंज येथे १० हजार क्विंटल, चामोर्शी येथील डीएमओ गोदामाची क्षमता पाच हजार क्विंटल, येनापूर येथील गोदामाची क्षमता १० हजार क्विंटल, आष्टी येथील गोदामाची क्षमता १० हजार क्विंटल, चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील वन समितीच्या गोदामाची क्षमता तीन हजार क्विंटल, विवेकानंदपूर येथील गोदाम २० हजार क्विंटल, मथुरानगर येथील गोदाम १ हजार ५०० क्विंटल, गणपूर येथील गोदाम १ हजार ५०० क्विंटल, घोट येथील गोदामाची क्षमता २ हजार ५०० क्विंटल एवढी आहे. या सर्व गोदामांची एकूण क्षमता ७३ हजार क्विंटल एवढी आहे.धान्याची खरेदी केल्यानंतर भरडाईसाठी काही कालावधी लागत असल्याने या कालावधीत धान्य सुरक्षित असणे आवश्यक आहे. अन्यथा सदर धान्य पावसाच्या पाण्यात भिजण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक खरेदी केंद्राच्या जवळपासचे गोदाम धान्य साठवणुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सद्य:स्थितीत जिल्हाभरात पावसाचा जोर सुरू आहे. अशातच १६ आॅक्टोबरपासून धान खरेदीला सुरुवात होणार आहे. खरेदी केलेले धान्य भिजू नये, शेतकरी व शासनाचे सुद्धा नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन केले आहे.चार वर्षांपूर्वी झाले होते कोट्यवधींचे नुकसान४चार वर्षांपूर्वी आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेले कोट्यवधी रूपयांचे धान्य पावसाच्या पाण्यात भिजले होते. शेतकºयांकडून खरेदी केलेले धान्य खरेदी केंद्राच्या परिसरातच ठेवण्यात आले होते. काही ठिकाणचे धान्य कुजून उग्र वास येत होता. या घटनेची पुनर्रावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर्षी अगदी सुरुवातीलाच गोदामांचे नियोजन केले असल्याचे दिसून येत आहे. नियोजनानुसार मात्र धान्याची उचल होऊन ते तत्काळ गोदामामध्ये पोहोचणे आवश्यक आहे. कधीकधी वाहनाअभावी वाहतुकीस अडथळा होत असल्याचा अनुभव आहे.