शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

ई लिलावातून ग्रा.पं. ला अधिक उत्पन्न शक्य

By admin | Updated: October 8, 2016 01:59 IST

तेंदू आणि बांबूमधून अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर ग्रामपंचायतींनी ई लिलाव पद्धतीचा स्वीकार

गडचिरोली : तेंदू आणि बांबूमधून अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर ग्रामपंचायतींनी ई लिलाव पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे, याबाबत ग्रामपंचायतस्तरावर चर्चा घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले. पेसा ग्रामपंचायमधील वनउपज व्यवस्थापन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहाय्यक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोेफा, मोहन हिराबाई हिरालाल आदी उपस्थित होते. पेसा अंतर्गत मागील हंगामात ग्रामपंचायतींना तेंदू आणि बांबू लिलावातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पादन मिळाले. मात्र हे लिलाव स्थानिकस्तरावर होत आहे. यात अधिक पारदर्शकता यावी आणि मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी ई टेंडरच्या माध्यमातून संपूर्ण देशातील खरेदीदारांना सहभागी करून घेता येणे शक्य आहे. स्पर्धा वाढल्यास ग्रामपंचायतीचे उत्पादन वाढेल. यासाठी जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींनी सहमती दर्शविली होती. या खरेदी-विक्री व्यवहारावर ग्रामपंचायतीचे पूर्ण नियंत्रण असावे, यासाठी ग्रामकोषातून पैसे काढताना तीन जणांच्या स्वाक्षरीची सक्ती करण्याची गरज आहे. याबाबत बँकांनाही अवगत करून देण्याची गरज असल्याचे नायक यावेळी म्हणाले.