लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाभरातील कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून गुरूवारी काम केले.गडचिरोली - जुनी पेंशन लागू करावी, सर्व संवर्गातील वेतन त्रूटी दूर कराव्या, केंद्राप्रमाणे भत्ते लागू करावे, कंत्राटीकरण धोरण रद्द करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सुविधा द्याव्या, लिपीक व लेखा लिपीकाच्या ग्रेड वेतनात सुधारणा करावी, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती, बाल संगोपन रजा व अन्य सवलती मंजूर कराव्या आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यायासमोर काळ्याफिती लावून आंदोलन केले.चामोर्शी - चामोर्शी तालुक्यातील शिक्षकांनी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांच्या नेतृत्वात काळ्याफिती लावून काम केले. या आंदोलनाला तालुक्यातील इतरही शिक्षकांनी पाठिंबा दर्शविला आहे.भेंडाळा - परिसरातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथील सर्व शिक्षकांनी एकत्र येत काळ्याफिती लावून आंदोलन केले.कुरखेडा - शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष खिरेंद्र बांबोळे, जिल्हा कोषाध्यक्ष गणेश काटेंगे, केशव पर्वते, हेमंत मेश्राम, वैशाली कोसे, ज्ञानेश्वर निकोरे, पॅरेलाल दारूदसरे, अनिल पुराम, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लालचंद धाबेकर, नरेश बन्सोड, सीमा मडावी, मुरलीधर सयाम, धीरज सहारे, जुनी पेंशन हक्क संघटनेचे तुळशिदास नरोटे, मुलचंद शिवणकर, तुषार तिवारी, नेपाल वालदे आदींच्या नेतृत्वात कुरखेडा तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून काम केले.घोट - विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी काळ्याफिती लावून शिक्षक दिन साजरा केला. मागील १५ ते २० वर्षांपासून शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. काही शाळांना २० टक्के अनुदान दिले आहे. तर काही शाळांना अनुदान सुद्धा दिले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये शासनाविषयी नाराजी निर्माण झाली आहे. सर्व शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी शिक्षकांनी काळ्याफिती लावून शिक्षक दिन साजरा केला.धानोरा - धानोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून काम केले. वरिष्ठ लिपीक गणेश हांगे, कनिष्ठ लिपीक संदीप गेडाम, कृषी सहायक प्रकाश निंबार्ते, अनिल खरपुरिया, सत्यविजय शिंदे, मंगलदास शेडमाके, निर्मला अलाम, अनिता मल्लेलवार, आनंदराव केळकर, सोमेश्वर क्षिरसागर, जयदेव भाकरे, दिनेश पानसे, व्यंकटेश हारगुळे आदी उपस्थित होते.महसूल विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग, वनविभाग, शिक्षण विभाग व इतर विभागातील कर्मचाऱ्यांनीही काळ्याफिती लावून आंदोलन केले.११ सप्टेंबरला बेमुदत कामबंद आंदोलनआंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात ५ सप्टेंबर रोजी काळ्याफिती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. ९ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणीक संप केला जाणार आहे. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ९ सप्टेंबरच्या आंदोलनात जिल्हाभरातील सर्वच संवर्गाचे व विभागांचे कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन माहिती समन्वय समतीचे पदाधिकारी गुरूदेव नवघडे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
मागण्यांसाठी काळ्याफिती लावून वेधले शासनाचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST
९ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणीक संप केला जाणार आहे. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागण्यांसाठी काळ्याफिती लावून वेधले शासनाचे लक्ष
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची समन्वय समिती : ९ ला लाक्षणीक संप व मोर्चा