शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

विकासासाठी शासन कटिबद्ध

By admin | Updated: May 26, 2017 02:25 IST

राज्य शासनाने केवळ अडीच वर्षात शेती क्षेत्रात सुमारे ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. शाश्वत शेतीवर समृद्ध

संवाद यात्रा : देवराव होळी यांनी दिली पत्रपरिषदेत माहितीलोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : राज्य शासनाने केवळ अडीच वर्षात शेती क्षेत्रात सुमारे ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. शाश्वत शेतीवर समृद्ध शेतकऱ्याच्या माध्यमातून बळीराजाला कर्जमुक्त करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना त्यांना समजावून सांगण्यासाठी २५ ते २९ मे पर्यंत शिवार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पंडित दीनदयाल यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त शिवार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संवाद यात्रा आयोजित केली आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत सामान्य नागरिक, गरीब व्यक्ती यासाठी अनेक योजना शासनाने सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासन शेती विकासाला प्राधान्य देत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० सिंचन विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जमीन समतोल करणे, तलाव व बोडीकरणाचे काम हाती घेणे, जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविणे, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी महोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बांबू क्षेत्राचा विकास, मनरेगामार्फत विविध योजना, फिरते पशु चिकित्सालय, मेंढी पालनाला प्रोत्साहन, शेतीमालाचे योग्य विपनण, फलोत्पादनाचा विकास, उन्नत शेती आदी योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांना मोफत बियाणे, खते, कीटकनाशकांचाही पुरवठा केला जात असल्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेला जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर सेलुकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महिला अध्यक्ष माधवी पेशट्टीवार, जि. प. सदस्य प्रा. रमेश बारसागडे, न. पं. चे गट नेता प्रशांत येगलोपवार, साईनाथ बुरांडे, माजी उपसभापती केशव भांडकेर, रवी बोमनवार, अनिल कुनघाडकर, आनंद गण्यारपवार, परितोष मंडल, श्रावण सोनटक्के आदी उपस्थित होते.