शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

‘गोंडवाना’ची तीन बक्षिसांवर मोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

सिने अभिनेता श्रेयस तळपदे हे समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. श्रेयस यांच्यासोबत बक्षीसासह छायाचित्र काढण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होती. आपल्या विद्यापीठाचे नाव बक्षीसासाठी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी टाळ्यांच्या कडकडाटात तसेच ढोलताशे वाजवून आनंद व्यक्त करीत होते.

ठळक मुद्देयुवा महोत्सवाचा समारोप : मातीशिल्प, स्थळचित्र व सांस्कृतिक मिरवणुकीत बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठात २ ते ६ डिसेंबरदरम्यान आयोजित आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाचा शुक्रवारी (दि.६) मोठ्या उत्साहात समारोप झाला. सिने अभिनेता श्रेयस तळपदे याच्या उपस्थितीने या समारोपीय समारंभाची रंगत वाढली. या महोत्सवात गोंडवाना विद्यापीठाने तीन स्पर्धांमध्ये बक्षीस मिळविले.स्थळचित्र व सांस्कृतिक मिरवणूक या दोन स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठाने द्वितीय क्रमांक पटकाविला, तर माती शिल्पकाम मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या महोत्सवात भारतीय सुगम संगीत, पोस्टर मेकिंग, नकला, भारतीय समूह गायन, चिकटकला, एकांकिका, प्रश्नमंजूषा, व्यंगचित्रे, मूकनाट्य, वक्तृत्व स्पर्धा, तालवाद्य, स्वरावाद्य, पाश्चिमात्य एकलगायन, पाश्चिमात्य समूहगायन, प्रहसन, भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय शास्त्रीय गायन, वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लोक/आदिवासी नृत्य, प्रश्नमंजूषा या स्पर्धा घेण्यात आल्या.२ डिसेंबर पासून स्पर्धा असल्याने १ डिसेंबरलाच बहुतांश विद्यार्थी विद्यापीठात दाखल झाले होते. २ डिसेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत चाललेल्या विविध स्पर्धांमध्ये डोळ्याचे पारणे फिटतील, असे कलाविष्कार सादर केले. या माध्यमातून गडचिरोलीकरांना राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण बघता आले. असे स्पर्धक तयार करण्याची प्रेरणा मिळाली. सहा दिवस विद्यापीठ परिसर गजबजून गेला होता.यशस्वी आयोजनाची विद्यार्थ्यांनी दिली पावतीआंतरविद्यापीठीय युवा महोत्सव आयोजित करण्याची संधी गोंडवाना विद्यापीठाला प्राप्त झाली. या संधीचे सोने करीत विद्यापीठाने स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन केले. याची पावती स्पर्धेसाठी आलेल्या दुसऱ्या विद्यापीठातील विद्यार्थी व मान्यवर यांनी दिली. समारोपीय कार्यक्रमाच्या दिवशी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी व मान्यवरांनी विद्यापीठाच्या नियोजनाची प्रशंसा केली.पुढील वर्षी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्पर्धांचे आयोजन होणार आहे. कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्या कडून नांदेड विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना ध्वज हस्तांतरीत करण्यात आला.श्रेयससोबत छायाचित्र काढण्याची उत्सुकतासिने अभिनेता श्रेयस तळपदे हे समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. श्रेयस यांच्यासोबत बक्षीसासह छायाचित्र काढण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होती. आपल्या विद्यापीठाचे नाव बक्षीसासाठी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी टाळ्यांच्या कडकडाटात तसेच ढोलताशे वाजवून आनंद व्यक्त करीत होते.तरूणांचे हात उगारण्यासाठी नाही तर उभारण्यासाठी असल्याची प्रचिती- कुलगुरूपाच दिवस चाललेल्या युवा महोत्सवात तरूणाईचा उत्साह वाखाण्याजोगे होता. मस्ती करीत असतानाच त्यांना जबाबदारीचे भानही असल्याचे दिसून येत होते. प्रत्येक कलावंताने त्याच्या भुमिकेसाठी स्वत:ला समर्पीत केल्याचे दिसून येत होते. यावरून आजच्या युवकांचे हात उगारण्यासाठी नाही तर नवीन काही तरी उभारण्यासाठी आहेत. याची प्रचिती या युवा महोत्सवाच्या माध्यमातून झाली, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.विद्यापीठ लहान असल्याने युवा महोत्सवाची जबाबदारी पेलेल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आमच्या क्षमतेप्रमाणे चांगले करण्याचा प्रयत्न विद्यापीठाने करीत यशस्वी आयोजन केले आहे. यावरून गोंडवाना विद्यापीठावर सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यास आम्ही समर्थ आहोत, याची खात्री झाली आहे, असा विश्वासही डॉ. कल्याणकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Shreyas Talpadeश्रेयस तळपदे