शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

संपामुळे गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज झाले ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:56 IST

सुधारीत वेतन संरचनेनुसार सातवा वेतन आयोग, एकस्तर पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, आदीसह विविध मागण्यांसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे ३ जूनपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्दे२१ जणांचे रक्तदान । कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सुधारीत वेतन संरचनेनुसार सातवा वेतन आयोग, एकस्तर पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, आदीसह विविध मागण्यांसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे ३ जूनपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे. दरम्यान कर्मचाºयांनी २९ जून रोजी शनिवारला एक दिवसीय संप पुकारून आंदोलन केले. या आंदोलनामुळे गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज ढेपाळले.गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाºयांच्या आंदोलनाचे पाच टप्पे पार पडले असून पहिल्या टप्प्यात कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, संचालक, सहसंचालक, सचिव यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे. दुसºया टप्प्यात कर्मचाºयांनी तीन दिवस काळ्या फिती लावून कामकाज केले. तिसºया टप्प्यात विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. चवथ्या टप्प्यात सामुहिक रजा घेऊन विद्यापीठाचे कामकाज बंद ठेवण्यात आले. पाचव्या टप्प्यात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आता २९ जून रोजी एक दिवशीय राज्यव्यापी संप करण्यात आला.या संपादरम्यान सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात विद्यापीठ कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थी मिळून एकूण २१ जणांनी रक्तदान केले. डॉ. पंजाबराव देशमुख राष्टÑीय शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, शिक्षक हक्क आश्रम संघटनेचे प्रा. संतोष सुरडकर यांनी आंदोलनास भेट देऊन पाठींबा जाहीर केला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी व कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी आंदोलन स्थळी येऊन कर्मचाºयांशी चर्चा केली. प्रलंबित मागण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कर्मचाºयांना न्याय न दिल्यास गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने १५ जुलैपासून कर्मचाºयांचा बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.