शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या - देवराव होळी

By admin | Updated: November 29, 2014 01:19 IST

चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज या सिंचन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून नुकतीच या प्रकल्पाच्या कामाला आमदार डॉ. देवराव होळी यांनी भेट दिली...

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज या सिंचन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून नुकतीच या प्रकल्पाच्या कामाला आमदार डॉ. देवराव होळी यांनी भेट दिली व संपूर्ण प्रकल्पाच्या कामाची माहिती जाणून घेतली.या प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र निश्चित झाले असून बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांन्या योग्य न्याय देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे.आघाडी सरकारच्या काळात चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पामुळे ७१ गावातील ११ हजार ५१० हेक्टर सिंचन क्षेत्रावर ओलिताची सोय होणार आहे. बॅरेजच्या पाण्यासाठ्याची क्षमता ६२.५३ दसलक्ष घनमिटर असून चिचडोह बॅरेजच्या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील २८ व गडचिरोली जिल्ह्यातील ४३ अशा ७१ गावातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होणार आहे. ३८ दरवाजे या प्रकल्पाचे राहणार असून प्रकल्पाच्या गेटपासच्या पार्टच्या फेब्रीकेशनचे काम सध्या सुरू आहे. या कामाची आमदार डॉ. देवराव होळी यांनी पाहणी केली. चामोर्शी येथील ६ शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची कारवाई योग्यरितीने करा, तसेच प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र निश्चित झाले असून अशा शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला द्या, असे निर्देश पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी दिले. यावेळी आमदारांसमावेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, मानिकचंद कोहळे, मान्तेश श्रीरामे, बंडू चलाख, जयराम चलाख, प्रकल्प व्यवस्थापक एम. डी. साधनकर, बोरघाट उपसा सिंचन उपविभागाचे उपअभियंता रोषण हटवार, सुभाष होळबे, उपअभियंता विमोल सहारे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)