शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बस न थांबल्याने विद्यार्थिनी सायंकाळपर्यंत राहिल्या उभ्या

By admin | Updated: July 29, 2016 01:17 IST

येथील महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थिनींची शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसथांब्यावर बुधवारी सायंकाळी उभ्या होत्या.

आष्टी येथील प्रकार : बस चालकावर कारवाईची मागणी आष्टी : येथील महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थिनींची शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसथांब्यावर बुधवारी सायंकाळी उभ्या होत्या. दरम्यान सुपर बस आली. मात्र सदर बसच्या चालकाने बस न थांबविल्याने शालेय विद्यार्थिनींना सायंकाळी ६. ३० वाजेपर्यंत बसथांब्यावर ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे बस आगाराविषयी पालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. सदर बसच्या चालकावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. शासनाने मुलींसाठी मोफत पास योजना सुरू केली आहे. याकरिता मानव विकास मिशन योजनेंतर्गत बस आगाराला नव्या बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु अनेक ठिकाणी या बसेस पोहोचत नसल्याने मुलींना सुपर बसशिवाय पर्याय राहत नाही. मात्र सुपर बसचे चालक मुलींना बसमध्ये घेत नाही. असाच प्रकार आष्टी परिसरात मार्र्कंडा (कं.) येथील बसथांब्यावरही घडला. मार्र्कंडा (कं.) हा बसथांबा नसल्याचे कारण सांगून मुलींना बसमध्ये बसण्यास मज्जावही यापूर्वी करण्यात आला. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनींना अनेकदा बसमध्ये प्रवेश दिला जात नसल्याने विद्यार्थिनींना सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ताटकळत राहावे लागते. तसेच या भागात अहेरी आगाराच्या बसेस चंदनखेडी येथे थांबत नसल्याने रामनगट्टा, चंदनखेडी येथील मुलींना शाळेत येण्यासाठी साधारण बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे विद्यार्थिनींना शाळेसाठी उशीर होतो. अनेकदा तासही बुडतात. परिणामी या विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता चंदनखेडी येथे सुपर बसचा थांबा द्यावा, तसेच मार्र्कंडा (कं.) येथील मुलींना सुपर बसमध्ये बसू देण्यासंबंधी आगार प्रमुखांनी वाहकचालकांना सूचना द्याव्या, अशी मागणी या भागातील पालकांनी केली आहे. (प्रतिनिधी)