शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

जंगल न तोडता रोजगार मिळवा अगरबत्ती व वीटभट्टी प्रकल्प सुरू

By admin | Updated: May 17, 2014 23:41 IST

जिल्ह्यात जंगल असेपर्यंत आपली उपजीविका कायम आहे. जंगल धोक्यात आल्यास सर्वच धोक्यात येईल. त्यामुळे जंगल न तोडता रोजगार उपलब्ध करून घ्यावा,

प्रधान वन सचिवांचे आवाहन

चामोर्शी : जिल्ह्यात जंगल असेपर्यंत आपली उपजीविका कायम आहे. जंगल धोक्यात आल्यास सर्वच धोक्यात येईल. त्यामुळे जंगल न तोडता रोजगार उपलब्ध करून घ्यावा, यासाठी वनविभाग सहाय्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान वनसचिव प्रविण परदेशी यांनी केले. चामोर्शी येथे अगरबत्ती व वीटभट्टी प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. संयुक्त वनव्यवस्थापन समिती व वनपरिक्षेत्र चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने अगरबत्ती व वीटभट्टी प्रकल्प शनिवारी सुरू करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी होते. प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एम. देवेंद्रसिंह, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, शुक्ला, उपविभागी वनाधिकारी बावनकर, पाटील, तिरपुडे, जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के उपस्थित होते. दरवर्षी शासनाला सव्वाशे कोटीचे उत्पन्न जिल्ह्यातील वनातून मिळते. दरवर्षी ५० कोटी मजुरी व ५० कोटी बोनस तेंदू हंगामातून दिला जातो. जिल्ह्यात ७ हजार ५०० गॅसचे वितरण करण्यात आले. पुन्हा ८५ हजार सुधारित चुली वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती टी. एस. के. रेड्डी यांनी दिली. यावेळी २२ गावातील समितीच्या अध्यक्षांसोबत प्रधान सचिवांनी संवाद साधला. दरम्यान वनकर्मचारी व समित्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच बांबूहस्तकला कारागिरांना कीट देण्यात आले. संचालन वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार तर आभार सिद्धार्थ मेश्राम यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)