शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गेवर्धात दोन तास चक्काजाम

By admin | Updated: June 5, 2016 01:13 IST

आदिवासी विकास महामंडळामार्फत सहकारी संस्थांकडून तालुक्यातील गेवर्धा येथे रबी हंगामातील उन्हाळी धान खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले होते.

शेतकरी रस्त्यावर : उन्हाळी धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलनकुरखेडा : आदिवासी विकास महामंडळामार्फत सहकारी संस्थांकडून तालुक्यातील गेवर्धा येथे रबी हंगामातील उन्हाळी धान खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र गोदाम नसल्याचे कारण पुढे करून गेल्या काही दिवसांपासून महामंडळाने सदर धान खरेदी प्रक्रिया बंद केली. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी ९ वाजतापासून ११ वाजेपर्यंत तब्बल दोन तास कुरखेडा-वडसा या मुख्य मार्गावर गेवर्धा येथे वाहतूक रोखून चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामंडळ प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर आदिवासी विकास महामंडळ प्रशासनातर्फे गेवर्धा केंद्रावर खरेदी प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे लेखी हमी दिल्यानंतर सदर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, कुरखेडा पं. स. चे उपसभापती बबन बुद्धे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार, सरपंच टिकाराम कोरेटी, डॉ. परशुराम खुणे यांनी केले.यावेळी उपसरपंच संदीप नखाते, आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे सभापती गणपत उसेंडी, उपसभापती प्रभू नाकतोडे, मनोहर लांजेवार, ग्रा. पं. सदस्य रोशन सय्यद, देवानंद खुणे, निजामुद्दीन शेख, जावेद शेख, पुंडलिक देशमुख, अशोक कंगाले, खुशाल बन्साडे, खुशाल दखणे, पप्पू शेख, जीवन पर्वते, दिलीप कांबळे, नागोराव नाकाडे, तेजराम बुद्धे, दामोधर बारई, नीलेश खुणे, मुनीश्वर लांजेवार, श्रीकांत गोबाडे, नासिर खान, दयाराम कवडो, हर्षवर्धन मडावी, महादेव म्हस्के, योगेश नखाते आदी उपस्थित होते. आदिवासी विकास महामंडळाने गेवर्धा संस्थेंतर्गत धान खरेदी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र गोदामाची साठवणूक क्षमता मर्यादित असल्याने तसेच गोदामातील मालाची उचल न केल्याने येथील धान खरेदी प्रक्रिया बंद केली होती. आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुरखेडा पोलिसांनी सर्व आंदोलकांना स्थानबद्ध करीत ठाण्यात आणले. त्यानंतर काही वेळाने आंदोलकांची सुटका करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)