शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंचच्या महिला सक्षमीकरणाची जर्मनीच्या शिष्टमंडळाने जाणली माहिती

By admin | Updated: March 26, 2017 00:45 IST

भारतातील ग्रामीण विकास, युवक कल्याण व महिला सक्षमीकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी इंडो जर्मन को-आॅपरेटिव्ह मुव्हमेंटचे ...

स्टिना आणि एक्झीनाची लोकमत कार्यालयास भेटगडचिरोली : भारतातील ग्रामीण विकास, युवक कल्याण व महिला सक्षमीकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी इंडो जर्मन को-आॅपरेटिव्ह मुव्हमेंटचे दोन सदस्यीय शिष्टमंडळ सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या अंतर्गत त्यांनी शनिवारी सकाळी लोकमत जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकमत सखीमंचच्याद्वारे चालविण्यात येत असलेल्या महिला सक्षमीकरण उपक्रमाची माहिती जाणून घेतली. यावेळी लोकमतचे कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन यांनी स्टिना व एक्झीना या दोन्ही सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यानंतर शिष्टमंडळाच्या सदस्यांनी लोकमत सखीमंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला मालार्पण केले. त्यांना गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात लोकमत सखीमंचच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. लोकमत सखीमंचशी जिल्ह्यातील तीन हजारवर अधिक महिला जुळलेल्या आहे. यांच्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक व प्रबोधनात्मक उपक्रम चालविल्या जातात, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय राज्यस्तरावरही लोकमत सखीमंच चालवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. लोकमतच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सत्कारही केला जातो, असे त्यांना सांगितले. लोकमत हे महाराष्ट्र व गोव्यातील क्रमांक १ चे दैनिक असून या वृत्तपत्र समुहातर्फे देशभर विविध उपक्रम चालविले जातात. लोकमत केवळ वृत्तपत्रच नसून सामाजिक सुधारणांसाठी अग्रेसर असलेली संस्था असल्याची माहिती त्यांना जर्मन शिष्टमंडळाला दिली. त्यांनी याबाबीचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरताना ही बाब आम्हालाही प्रकर्षाने जाणवली, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्यातील लोकमतच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळे अनुभव व सखीमंचच्या महिला सक्षमीकरण कार्याची प्रेरणा आम्हाला जर्मनीत काम करतानाही वेळोवेळी उपयोगी पडणारी आहे, असे स्टिना व एक्झीना म्हणाल्या.यावेळी इंडियन इन्स्टिट्युट आॅफ युथ वेल्फेअर गडचिरोलीचे प्रमुख मनोहर हेपट, गडचिरोलीचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे, सुरचित हेपट, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, लोकमत समाचारचे सुनिल चौरसिया, लोकमत बाल विकास मंचच्या संयोजिका किरण पवार, युवा नेक्स्टच्या संयोजिका वर्षा पडघन, विवेक कारेमोरे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)