शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

चहा विक्रेत्याच्या मुलीची गगनभरारी

By admin | Updated: June 18, 2014 00:12 IST

शैक्षणिक गुणवत्तेत श्रीमंताची मुले येणे हे नवे व कठीण नाही. मात्र अठराविश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबात हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यशाची गगनभरारी घेणे हे कौतुकास्पद आहे. येथील राणी

दिलीप दहेलकर - गडचिरोलीशैक्षणिक गुणवत्तेत श्रीमंताची मुले येणे हे नवे व कठीण नाही. मात्र अठराविश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबात हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यशाची गगनभरारी घेणे हे कौतुकास्पद आहे. येथील राणी दुर्गावती कन्या विद्यालयात शिकणारी पूजा चंद्रगुप्त चुनारकर या चहा विक्रेत्याच्या मुलीने ९०.६० टक्के गुण घेऊन इयत्ता १० वीच्या परीक्षेत सुयश मिळविले आहे. अभ्यासातील सातत्य व मनाची जिद्द या बळावर पूजाने यशाची गगनभरारी घेतली आहे.पूजा चुनारकर ही आपल्या आई-वडील व लहान बहिणीसमवेत येथील फुले वार्डात स्वत:च्या छोट्याशा घरात वास्तव्याने आहे. पूजाची लहान बहीण ९ व्या वर्गात सेमी इंग्रजी माध्यमाला येथील विद्याभारती हायस्कूलमध्ये शिकत आहे. पूजाची आई गृहिणी असून वडील येथील आठवडी बाजार परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे एका दिवसाचे उत्पन्न १५० ते २०० रूपये आहे. पूजाचे कुटुंब केवळ चहाच्या दुकानावरच चालते. त्यांच्याकडे शेतीही नाही. पूजाचे वडील फक्त पाचवा वर्ग शिकलेले आहेत. तर आई अशिक्षित आहे. अशा अशिक्षित कुटुंबात राहून पूजाने अभ्यासातील सातत्य, जिद्द व चिकाटी याच्या बळावरच हे यश मिळविले आहे. मी रोज ६ तास अभ्यास करीत होते असे पूजाने सांगितले. घरासभोवताल टीव्हीचा गोंगाट असल्यामुळे पूजा आपल्या मैत्रिणीसोबत येथील शिवाजी सार्वजनिक वाचनालयात सकाळी व सायंकाळी रोज जाऊन अभ्यास करीत होती, असेही तिने लोकमतला सांगितले.याबरोबरच शाळेच्या सुटीच्या दिवशी पूजाही आपल्या मैत्रिणीसमवेत कॉम्प्लेक्स परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील वाचनालयात जाऊन अभ्यास करीत होती. घरात कुणीही शिक्षित नसतांना आपण शिक्षणात प्रगती करून कुटुंबांचा आर्थिक आधार होण्याची मनिषा पूजाने बाळगली आहे. हुशार व चांगल्या मैत्रिणींची सोबत मिळाल्यानेच शिक्षकवृंद्धाच्या मार्गदर्शनातून हे यश मिळविल्याचे पूजाने सांगितले. १० वीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या पूजा चुनारकर हिने इयत्ता १२ वीचे शिक्षण विज्ञान शाखेतून घेऊन भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची इच्छा लोकमतजवळ व्यक्त केली. पूजाच्या यशाबद्दल तिचे नातेवाईक, शेजारी, शिक्षकवृंद व मित्र परिवाराकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.