शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरावर गडचिरोलीची दखल

By admin | Updated: January 4, 2017 01:17 IST

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात देखील निवडणूक आॅनलाईन यंत्रणा उभारल्या बद्दल राज्य निवडणूक

निवडणूक कामकाज आॅनलाईन : निवडणूक आयोगाकडून प्रशंसा गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात देखील निवडणूक आॅनलाईन यंत्रणा उभारल्या बद्दल राज्य निवडणूक आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक केले आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगर पालिका, नगर पालिका निवडणूक पूर्व तयारी आढावा मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सींगवरून घेण्यात आला. यावेळी निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी गडचिरोली प्रशासनाचे कौतुक केले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असावी, यासाठी अधिकाधिक काम संगणकाच्या मदतीने करण्याचा प्रयत्न आयोग करीत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली प्रशासनाच्या कामाची दखल घेण्यात आली. या कॉन्फरन्सींगला जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, नगर प्रशासन अधिकारी गजानन भोयर आदी उपस्थित होते. घोषीत वेळापत्रकानुसार ५ जानेवारी २०१७ रोजी १ जानेवारी २०१७ अहर्ता दिनांक गृहित धरून तयार करण्यात आलेल्या मतदार यादीचा आराखडा प्रसिध्द करावयाचा आहे. त्यानंतर त्यावर हरकती आणि आक्षेप मागवून २१ जानेवारी २०१७ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करावयाची आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पंचायत समिती निहाय निवडणूक अधिकारी हे उपजिल्हाधिकारी दर्जाचे असावेत आणि अप्पर जिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना निवडणूक निरिक्षक नेमावे, अशा सूचना निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी यावेळी दिल्या. (जिल्हा प्रतिनिधी)