शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नक्षली सावटात हरवले गडचिरोलीचे पर्यटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2015 01:05 IST

जिल्ह्यात ४० वर अधिक पर्यटन स्थळे आहेत. भारतात कुठे नव्हे ती प्रचंड वनसंपदा व वन्यजीव तसेच वन औषधी या जिल्ह्यात आहे.

पर्यटन दिन विशेष : पाहण्यासारखे बरेच काही असूनही पर्यटकांचा पाय मात्र वळत नाही; सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे गडचिरोली : जिल्ह्यात ४० वर अधिक पर्यटन स्थळे आहेत. भारतात कुठे नव्हे ती प्रचंड वनसंपदा व वन्यजीव तसेच वन औषधी या जिल्ह्यात आहे. एकट्या जंगलाच्या भरवशावर इको पर्यटन होऊ शकते. परंतु १९८० पासून या जिल्ह्यात नक्षली चळवळीचा उद्रेक झाल्याने राज्य व देशाच्या अनेक भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांचा पाय गडचिरोलीच्या मातीकडे वळत नाही. त्यामुळे या भागातील पर्यटन केवळ कागदावरच आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये मार्र्कंडा, हेमलकसा, आवलमरी, टिप्पागड, सिरोंचा, खोब्रामेंढा, काशीबेल कुनघाडा, ग्लोरी आॅफ फॉरेस्ट, लख्खामेंढा, डोंगरमेंढा, बिनागुंडा, कोलामार्का, भामरागडचे लाकडाचे रेस्ट हाऊस, भंडारेश्वर मंदिर, वैरागड किल्ला, हत्तीकॅम्प कमलापूर, भवरागड, मेंढालेखा, चंद्राखंडी पहाडी, सोमनूर संगम यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक महत्त्वाच्या वनस्पती प्रजाती जंगलात आहे. चपराळा अभयारण्यातही भटकंती करण्याला प्रचंड वाव आहे. ज्यांना जंगल सफारी करायची असेल त्यांच्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात प्रचंड चांगले वातावरण आहे. प्रदूषण नसल्याने निसर्ग पर्यटनाला प्रचंड वाव या ठिकाणी आहे. या सर्व बाबी असतानाही पर्यटन विकासाच्या दृष्टीने आजवर कोणत्याही उपाययोजना झाल्या नाही. किमान आठवडाभर पर्यटकाला या भागात फिरण्यासारखे प्रचंड वातावरण व स्थळ असताना यादृष्टीने आजवर कधीही प्रयत्न झाले नाही. केवळ नक्षलवाद्यांची दहशत हा एकमेव अडसर पर्यटकांना जिल्ह्यात येण्यासाठी नाही. तर पर्यटनासाठी लागणाऱ्या या आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध नसल्याने या जिल्ह्याच्या पर्यटनाविषयी कमालीची उदासीनता दिसून येते. या बाबतचे चित्र बदलविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने पाऊल अद्यापही टाकल्या गेलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)