शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील मुख्य मार्ग खड्ड्यात

By admin | Updated: September 14, 2015 01:14 IST

शहरातील आरमोरी, चामोर्शी, धानोरा व मूल या चारही मुख्य मार्गांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

अपघात वाढले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षगडचिरोली : शहरातील आरमोरी, चामोर्शी, धानोरा व मूल या चारही मुख्य मार्गांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. अपघातांमध्येही वाढ झाली आहे. शहरात एकही बायपास मार्ग नसल्याने प्रवाशी वाहनांसह मालवाहू वाहनेही शहराच्या मुख्य चौकातूनच जातात. त्याचबरोबर दुचाकी व चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. गांधी चौकापासून ते वन विभागाच्या नाक्यापर्यंत आरमोरी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. चामोर्शी मार्गावर दोन महिन्यांपूर्वी अंतर्गत वीज तार टाकण्याचे काम करण्यात आले होते. यासाठी ठिकठिकाणी मार्ग खोदून ठेवण्यात आला आहे. त्यावर केवळ माती पसरविण्यात आली. मात्र सदर माती आता पावसामुळे दबल्याने या ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहने क्षतिग्रस्त होत आहेत. धानोरा व मूल मार्गावरही प्रचंड खड्डे पडले आहेत. एक खड्डा चुकविताच वाहन दुसऱ्या खड्ड्यामध्ये पडते. याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे धूळ उडत असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. सदर मार्ग दुरूस्त करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आली आहे. मात्र या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने खड्डे कायम आहेत. (नगर प्रतिनिधी)