शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून महिलेवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: May 27, 2017 01:16 IST

मागील काही वर्षांपासून अहेरी शहरात साधारण ६० वर्षे वयाची एक वेडसर महिला फिरत होती.

अहेरीतील मंडळांचे सहकार्य : वेडसर महिलेवर रितीरिवाजानुसार केले सोपस्कार लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : मागील काही वर्षांपासून अहेरी शहरात साधारण ६० वर्षे वयाची एक वेडसर महिला फिरत होती. कोणी तिला पोदाडी तर कोणी सोनाबाई असे म्हणत. या महिलेचा गुरूवारी सायंकाळी मृत्यू झाला. अहेरी येथील युवकांनी लोकवर्गणी गोळा करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. अहेरीत होणाऱ्या लग्नसमारंभात ती आवर्जून उपस्थित राहून वरातीत नाचायची. ही आजी कुठली, तिचे कोण नातेवाईक याची माहिती अहेरीतील कुणाकडेच नाही. इकडे तिकडे अन्न मागून ती कशीतरी जीवन जगत होती. मागील एका वर्षांपासून तिच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली व ती अंध झाली. नगर पंचायत परिसरातील मित्रपरिवार दररोज तिच्या जेवणाची, पाण्याची, चहाची व्यवस्था करीत होते. तिला वाटेल तेथे नेऊन सोडत होते. प्रचंड उन्हाच्या तडाख्याने व वृद्धपाळाने गुरूवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान जुन्या एस.बी. महाविद्यालयाजवळ तिने अखेरचा श्वास घेतला. ही बाब हेल्पिंग हॅन्ड्स, एकता क्रीडा मंडळ, नगर मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना माहीत झाली. याची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. गुरूवारी तिचा मृतदेह अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. शुक्रवारी डॉ.संजय उमाटे यांनी स्वत: अगदी पहाटेच तिचे शवविच्छेदन आटोपुन या आजीचा मृतदेह हेल्पिंग हॅन्ड्स व एकता क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविला. या आजीचे कोणीच नातेवाईक नसल्याने अहेरीकरांनीच वाजा, फटाके व इतर सन्मानजनक विधी करून सन्मानाने सोनाबाईचा अंत्यविधी शुक्रवारी सकाळी ९ वाजता पार पडला. यासाठी लागणारा खर्च हेल्पिंग हॅन्ड्स, एकता क्रीडा मंडळ, नगर मित्र मंडळातर्फे करण्यात आला. अंत्यविधीला नगरसेवक श्रीनिवास चटारे, सचिन पेदापल्लीवार, श्रीनिवास वीरगोनवार, मनोज मेडपल्लीवार, शंकर मगडीवार, रवी नेलकुद्री, उमेश गुप्ता, बबलू गुप्ता, बंडू गुरूनुले, संतोष येमुलवार, महेश बेझंकीवार, संतोष बेझंकीवार, पप्पू मद्दीवार, प्रतीक मुधोळकर, इस्ताक शेख, अमोल गुडेल्लीवार, शफी पठाण, नितीन जंगावार, गणेश डोके, अशोक चांदेकर, श्रीनिवास मगडीवार, दीपक सुनतकर उपस्थित होते.