शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले

By admin | Updated: July 30, 2016 01:48 IST

बोदली घाटावरून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी

अवैध वाहतूक : महसूल विभागाची कारवाई गडचिरोली : बोदली घाटावरून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून ३१ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. बोदली घाटावरून अवैध रेतीची वाहतूक केली जात असल्याची बाब नागरिकांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. त्यानंतर गडचिरोलीचे मंडळ अधिकारी एस. एस. बारसागडे यांच्यासह तलाठी अजय तुंकलवार, भास्कर बांबोळे, विकास कुमरे, गणेश खांडरे यांनी शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता रेती घाटाला भेट दिली असता, बोदली येथील नरेंद्र भांडेकर, दुग्गा, कुकुडकर व गावतुरे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. सदर ट्रॅक्टर अडविण्यात आल्या. पंचनामा केल्यानंतर त्या ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आल्या. प्रत्येक ट्रॅक्टरवर ७ हजार ९०० रूपयांचा दंड तहसीलदारांनी ठोठावला. ट्रॅक्टर मालकांनी सदर दंड भरल्यानंतर ट्रॅक्टर सोडण्यात आल्या. गडचिरोली तालुक्यात अनेक रेती घाटावरून अवैधरित्या क्षमतेपेक्षा अधिक व रॉयल्टीपेक्षा जास्त रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)