शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकासासाठी चार हजार कोटींचा निधी प्रस्तावित

By admin | Updated: October 12, 2015 01:45 IST

डावी उजवी विचारसरणी या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी केंद्र शासनाने सुमारे ३ हजार ९४२ कोटी रूपये प्रस्तावित केले ...

पत्रकार परिषद : अशोक नेते यांची माहिती एटापल्ली/सिरोंचा/आलापल्ली : डावी उजवी विचारसरणी या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी केंद्र शासनाने सुमारे ३ हजार ९४२ कोटी रूपये प्रस्तावित केले असून काही दिवसात मंजुरी मिळताच विकासकामांना सुरूवात होईल, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी एटापल्ली, सिरोंचा, आलापल्ली येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान दिली.केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती घेऊन योजनांचा लाभ घेतल्यास विकासाची दारे मोकळी होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यात पाच सिंचन बंधारे मंजूर करून घेतले आहेत. चिचडोह येथील सिंचन योजनेचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात लहान-लहान उद्योग सुरू होणार असून सर्वांना रोजगार उपलब्ध होणार आहे. डावी उजवी विचारसरणीचा शिकार गडचिरोली जिल्हा बनला आहे. ही विचारसरणी ज्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे त्या जिल्ह्यांचा विकास रखडला आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ३ हजार ९४२ कोटी रूपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातून विकास कामे होण्यास फार मोठी मदत होईल. सुरजागड प्रकल्प चालू झाला तर आष्टी येथे २०० ते ३०० एकर जागा खरेदी करून प्रकल्प सुरू केला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत सुरजागड प्रकल्प बाहेर जिल्ह्यात जाऊ दिल्या जाणार नाही, अशी माहिती दिली. पत्रकार परिषदेला बाबुराव कोहळे, रविंद्र ओल्लालवार, विनोद आकनपल्लीवार आदी उपस्थित होते.